पुणे

पालकांकडे पैसे नसल्याने रखडली जबड्यातील शस्त्रक्रिया

जितेंद्र मैड

पौड रस्ता -  मुलीच्या जबड्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात गेलो, तर डॉक्‍टरांनी मला साठ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. तिच्या जबड्यावर पहिली शस्त्रक्रिया केली, तेव्हा एक लाख चौदा हजार रुपये खर्च झाले होते. सरकारी मदत व आमच्याकडील पैशांनी ती वेळ निभावून नेली होती. आता शस्त्रक्रिया करून मुलीच्या तोंडातील प्लेट काढण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न आयेशाचे वडील अब्दुल जकाती यांच्यासमोर उभा आहे.

लोकमान्य झोपडपट्टीत राहात असलेल्या आयेशा अब्दुल जकाती या सात वर्षीय चिमुरडीला ९ ऑगस्ट २०१८ रोजी मराठी क्रांती मोर्चातील आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला होता. त्यात आयेशाचा जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या घरची आर्थिक स्थिती व उपचारात होत असलेली हेळसांडीबाबत ‘सकाळ’ने यापूर्वी वाचा फोडली. त्यानंतर आयेशाला महापालिकेच्या आर्थिक मदतीतून एका रुग्णालयात उपचाराची सुविधा मिळाली; परंतु महापालिकेकडून अजूनही संबंधित दवाखान्याला पैसे मिळाले नसल्याचे डॉक्‍टरांनी आयेशाच्या पालकांना सांगितले. 

आयेशाची आई मुमताज जकाती म्हणाल्या, ‘‘पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्‍टरांनी तीन महिन्यांनंतर तोंडातील प्लेट काढणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मदत निधीची या वर्षाची मर्यादा संपल्यामुळे डॉक्‍टरांनी आता आम्हाला पैसे भरायला सांगितले आहे. नाहीतर नवीन आर्थिक वर्षात एप्रिलनंतर पुन्हा निधी मिळाल्यावर तिची प्लेट काढावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत तिच्या तोंडातील प्लेटवर मांस चढले तर ती काढायला त्रास होईल. यामुळे काय करावे, हे कळत नाही.’’ 

आयेशा ही कोणत्याही आंदोलनाचा भाग नव्हती. ती आपल्या घराजवळ खेळत होती. अश्रुधुराची नळकांडी लागल्याने ती जखमी झाली. तिचे शैक्षणिक नुकसान झाले. महापालिका आरोग्य सुविधा देते; परंतु त्यात कोट्याची मर्यादा आली आहे. त्यामुळे आयेशाचा उपचार लांबला आहे. या सर्व गोंधळात आयेशाच्या उपचाराचे काय, हा प्रश्न मात्र तिच्या पालकांसमोर आ वासून उभा आहे.

आयेशाच्या पालकांनी शस्त्रक्रियेच्या खर्चाचे संबंधित रुग्णालयाचे कोटेशन घेऊन तत्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. त्या रुग्णालयाच्या प्रशासनाशी बोलून आयेशावर तत्काळ उपचार करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. 
-डॉ. रामचंद्र हंकारे,  आरोग्य अधिकारी, महापालिका.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT