Pay taxes even on holidays pune Municipal Corporation
Pay taxes even on holidays pune Municipal Corporation 
पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; सुटीच्या दिवशीही भरा मिळकत कर

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या तिजोरीत ५ मार्चअखेर मिळकत करापोटी १४३८ कोटी ९३ लाखांची रक्कम जमा झाली आहे. त्यातील सुमारे ५० टक्के रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा झाली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालये सुरू राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिळकत कराचा भरणा न करणाऱ्या ४३७ मिळकतींवर जप्तीची कारवाई महापालिकेने केली आहे. त्यातील ११६ मिळकतदारांनी १३ कोटी ६८ लाख २८ हजार ३७३ रुपयांची थकबाकी भरल्यामुळे त्यातील ११६ मिळकती सीलमुक्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहमहापालिका आयुक्त आणि मिळकत कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली. तसेच ७ कोटी ७२ लाखांची थकबाकी न भरल्यामुळे ९ मालमत्तांचा लिलाव करण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

५ लाख ३७ हजार ९११ नागरिकांनी ७७५ कोटी ६५ लाखांचा मिळकत कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे. तर, १ लाख २६ हजार ५९२ नागरिकांनी १६६ कोटी ३० लाख रुपये रोख रकमेद्वारे भरला आहे. तर, १ लाख ०१ हजार १४ नागरिकांनी धनादेशाद्वारे ४९६ कोटी ६७ लाख रुपयांचा मिळकत कर भरला आहे, असेही कानडे यांनी सांगितले. मिळकत कर भरण्यासाठी शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रे सोमवार ते शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान सुरू राहणार असून रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्‍पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT