crime_logo
crime_logo 
पुणे

पिंपरी - पित्यासह तिघांनी केले बालिकेवर अत्याचार 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - घरात पित्याने लैंगिक अत्याचार केल्याने बारा वर्षीय बालिकेला हैदराबादला नातेवाइकांकडे पाठविले. मात्र तिला भीक मागण्यासाठी मिरचीची धुरी देण्यात आली. या त्रासाला कंटाळून तेथून तिने पळ काढला. हैदराबाद आणि सोलापूर रेल्वे स्टेशनवर अनोळखी दोन जणांनी लैंगिक अत्याचार केले. आता ती बालिका मुंबईतील एका बालकाश्रमात आहे. मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 

थेरगाव येथे राहणाऱ्या बारा वर्षीय मुलीवर 2016 मध्ये तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलीला पिंपरीतील आजीकडे पाठविले. तिथे आलेल्या वडिलांच्या मामीने पीडित मुलीला आपल्या घरी हैदराबाद येथे नेले. तिथे गेल्यावर एका मशिदीच्या बाहेर तिला भीक मागण्यास सांगितले. तिने भीक मागण्यास नकार दिल्याने तिची कपडे काढून वृद्ध महिला नातेवाईक आणि तिच्या मुलाने मिरचीची धुरी दिली. एवढेच नव्हे तर तिला जबर मारहाणही केली. या त्रासाला कंटाळून हैद्राबादमधून तिने पळ काढला. 

आपल्या घरी येण्यासाठी तिने हैदराबाद रेल्वे स्टेशन गाठले. गाडी लवकर नसल्याने तिने झोपण्यासाठी रेल्वेच्या रिकाम्या बोगीचा आसरा घेतला. त्यावेळी तिथे आलेल्या एका अपंग व्यक्‍तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याच्या तावडीतून सुटल्यावर ती रेल्वेने सोलापूर येथे आली. तिथेही तिच्यावर एक टक्‍कल असलेल्या व्यक्‍तीने लैंगिक अत्याचार केले. 

तिच्या आईने तिला पुण्यात आणून एका आश्रमात ठेवले. मात्र तेथील वातावरण चांगले नसल्याने ती पळून मुंबईला गेली. तिथे एका संस्थेच्या कार्यकर्त्यांना ती दिसली. तिला बांद्रा येथील आश्रमात ठेवल्यावर तिने घडलेली सर्व हकिगत सांगितली. त्यानुसार बांद्रा पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा तर हैदराबाद येथील नातेवाइकांच्या विरोधात मारहाण व इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील हा गुन्हा पुढील तपासाकरिता वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT