पुणे- महापालिकेने नव्याने पाणीकरार करण्यापूर्वी पाणीबिलाची थकीत रक्कम भरावी. तसेच, पाणीकराराचे ३१ ऑगस्टपर्यंत नूतनीकरण करून न घेतल्यास दुप्पट दराने पाणीपट्टी आकारण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिका प्रशासनाला दिला आहे. जलसंपदा विभागाने याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार महापालिकेने जलसंपदा विभागासोबत पाणीकरार करणे अपेक्षित आहे. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाण्यासंदर्भात सहा वर्षांसाठी करार झाला होता. ही मुदत गेल्या फेब्रुवारीत संपुष्टात आली आहे. त्यानंतर या कराराला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
थकबाकी ८८ कोटींवर
पुणे महापालिकेकडे पाणीबिलाची थकीत रक्कम ८८ कोटी ४४ लाख रुपये इतकी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.