पुणे

पीएमपीचे वर्षात पाचच ऑनलाइन पास

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ‘ऑनलाइन’ पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने वर्षात जेमतेम पाच विद्यार्थी आणि ३९ प्रवाशांनीच ऑनलाइन पास घेतल्याचे आकडेवारी सांगत आहे.  

पीएमपी प्रशासनाने सप्टेंबर २०१७ पासून ऑनलाइन पासची सुविधा उपलब्ध केली. तेव्हापासून फक्त पाचच विद्यार्थांनी या सेवेचा फायदा घेतला आहे. विद्यार्थांबरोबर पुणेकरांनीही या सुविधेकडे पाठ फिरवलेली दिसते. आत्तापर्यंत केवळ ३९ प्रवाशांनी हा पास घेतला आहे.  

ऑनलाइन पास घेण्यासाठी पीएमपीला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यामध्ये फोटो, राहण्याचा पत्ता यांसह अन्य काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आवश्‍यक कागदपत्रांतील एक कागद नसला किंवा फोटो खराब असला तरी अर्ज बाद केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेपासून विद्यार्थी व प्रवासी दूर राहणेच पसंद करतात.

ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी संगणकाच्या प्रणालीत सुधारणा करण्यात येत आहेत. हे काम पाहणाऱ्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला तसा आदेश दिला आहे. लवकरच अडचणी दूर होतील.
- सुरेश सोनवणे, पासप्रमुख, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT