PMPML_Bus 
पुणे

'या' २० मार्गांवर बस सुरू करता येईल; पीएमपीचा महापालिकेसमोर प्रस्ताव!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान बससेवा सुरू करावी, असा प्रस्ताव पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना सादर केला आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि शहराचा मध्य भाग सोडून उर्वरित शहरात सुमारे 20 मार्गांवर 95 बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.

शहरात एक जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली आहे. दुकाने, उद्याने काही प्रमाणात सुरू झाली आहे. विमान आणि रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होत आहे. रिक्षा आणि कॅबलाही काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे.

सध्या खासगी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या नागरिकांकडे खासगी वाहने नाहीत, विशेषतः कष्टकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यांना कामावर जाण्यासही अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीची सेवा ठराविक वेळेत सुरू करावी, असे पवार यांनी महापालिकेला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरे येथे पीएमपीची शटल सेवा सुरू करता येईल. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात येऊ शकेल. बसमध्ये सध्या त्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे, असेही त्यांत नमूद केले आहे.

स्वारगेटवरून निगडी, कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, अप्पर इंदिरानगर, धायरी आणि हडपसर, महापालिक भवनवरून लोहगाव, म्हाळुंगे, बालेवाडी, पाषाण, बावधन, चिंचवडगाव, माळवाडी, कोथरूड, पुणे स्टेशनवरून हडपसर, वाघोली, विश्रांतवाडी, कोंढवा खुर्द, हडपसर ते खराडी बायपास आदी 20 मार्गांवर बससेवा सुरू करता येईल, असेही प्रस्तावात म्हटले आहे. यासाठी स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरूड, कात्रज, मार्केटयार्ड, हडपसर, पुणे स्टेशन आणि बालेवाडी आगारांतील बस वापरता येतील. सुमारे 15 ते 30 मिनिटांच्या वारंवारितेनुसार या बस उपलब्ध करून देता येतील, असेही पवार यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

या बाबत पवार म्हणाले, ''शहरातील बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड, अशी बससेवा सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही प्रस्ताव दिला आहे. शहरातील सर्वच वाहतूक सुरू झालेली असताना, पीएमपी बंद ठेवणे योग्य नाही. ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत, अशा नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी सुरू करून पीएमपीची वाहतूक सुरू ठेवता येईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राज्याचा अर्थमंत्री कोण होणार ? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा केला खुलासा

Balochistan History : १९४७ पूर्वी स्वतंत्र होता बलुचिस्तान, मग पाकिस्तानचा भाग कसा बनला? फाळणीनंतरचा इतिहास

Latest Marathi News Update : मतदारसंघ पुनरर्चनेवरून NDAला पाठिंब्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Savatkada Waterfall : कोकणचा निसर्ग बहरला! रत्नागिरीतील 'सवतकडा धबधबा' पर्यटकांनी फुल्ल; मुंबई-पुण्याहून लोकांची गर्दी, पाहा सुंदर फोटो

Vidarbha News: FDAच्या कारवाईमुळे ५० लाखांचं नुकसान, उच्चस्तरीय चौकशीची मागणी; गोरस भांडार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

SCROLL FOR NEXT