इंजिनिअर तरुणाने शेतीचा नाद केला, लॉकडाउनमध्ये कमावले 13 लाख    | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khor

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले समीर डोंबे या तरुणाने आपल्या शेतीमध्ये नशिब अजमवण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यातील बाजार यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रयत्न करून स्वतःची विपणन व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

इंजिनिअर तरुणाने शेतीचा नाद केला, लॉकडाउनमध्ये कमावले 13 लाख   

यवत (पुणे) : देशात मार्च महिन्यात लॉकडाउन सुरू झाला. तेव्हापासून अनेक व्यवसाय मेटाकुटीला आले. शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचवण्यात अनेक अडचणी आल्या. इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. या परिस्थीतीवर दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या शेतकऱ्याने मात केली. स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण करत वीस टन अंजिराची सुरक्षीत विक्री केली. त्यातून सुमारे १३ लाख रुपयांचा व्यवसाय केला. 

उरुळी कांचनमधील महिला राजकीय पदाधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले समीर डोंबे या तरुणाने आपल्या शेतीमध्ये नशिब अजमवण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात केली. त्यातील बाजार यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रयत्न करून स्वतःची विपणन व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात चांगले यश आले. 'डोंबे पाटील' नावाने कंपनी स्थापन करून 'पवित्रक' हे अंजिराला ब्रॅंडनेम दिले. (अंजिराला संस्कृतमध्ये पवित्रक म्हणतात). 

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू

विविध मॉलमध्ये हे अंजीर त्याने विक्रीसाठी ठेवले. अनेक विक्रेते व ग्राहक यांच्यात विश्वास निर्माण केला. शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांच्या मनाला येईल त्या भावात होणारी अंजीरांची विक्री त्यामुळे थांबली. प्रतवारी केलेल्या दर्जेदार अंजीराला मागणी आणि भावही वाढला. विकसीत केलेली विपणन व्यवस्था लॉकडाउनच्या काळात चांगलीच उपयोगाला आली. या काळात स्वतःच्या शेतातील अंजीरासोबत कंपनीमार्फत गावातील ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या अंजीरांनाही बाजारपेठ उपलब्ध करून दिली. 

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान..

अंजिराचे गाव 
दौंड तालुका, जिल्ह, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रातील विविध पुरस्काराने गौरिवलेल्या समीर डोंबे या तरुणाने आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांचे सार्थक केले. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा इतर शेतकऱ्यांनाही फायदा करून दिला. खोर या आपल्या दुष्काळी गावाला 'अंजिराचे गाव' अशी ओळख मिळवून देण्यास समीर याचा मोठा वाटा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विक्री न झालेल्या अंजीरावर प्रक्रिया करून त्यापासून जॅम बनवण्याचे कामही डोंबे पाटील कंपनीने सुरू केले. या काळात अडीच ते तीन टन अंजिरापासून जॅमही बनवला. त्यासाही चांगली मागणी आहे. दर्जा आणि किंमत यात कोठेही तडजोड न करता या काळात व्यावसाय करण्यात यश आले. 
 - समीर डोंबे 

loading image
go to top