पुणे

सरकारला आमचा विसर; पोलिस पाटलांची खंत

दत्ता म्हसकर

जुन्नर : कोरोनाच्या संकटात गावपातळीवरील पोलिस पाटलांचा सरकारला विसर पडला की काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यांच्या समाजकार्याबाबत चकार शब्दही कोणत्या मंत्र्याने किंवा अधिकाऱ्याने काढला नसल्याची खंत पोलिस पाटील व्यक्त करत आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून पोलिस पाटलांना मानधन  मिळाले नसले तरी कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात गावोगावचे पाटील आपले कर्तव्य जबाबदारीने  पाडताना दिसत आहेत. 

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असणाऱ्या शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर एक हजार रूपये व पंचवीस लाखांचे विमा कवच जाहीर केले. मात्र, कोरोना निर्मूलनासाठी गावपातळीवर काम करणारा मानाचे पद असणारा पोलिस पाटील हा घटक वंचित राहिला असल्याने मंत्रिमहोदयांनी गावच्या या घटकाचा विचार करावा अशी मागणी होत आहे.  

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अपुऱ्या पोलिस बळामुळे पोलिस पाटलांच्या माध्यमातून गाव पातळीवर पोलिस, आरोग्य व महसूल प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. गावागावातून गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन समिती स्थापन करण्यात आली आहे. गावचा पोलिस पाटील हा या समितीचा सचिव आहे.

सरकारकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे या समितीचे काम असून, त्याचा जास्तीचा भार पोलिस पाटलावरच आहे. याबरोबर गावात मोकाट फिरणाऱ्यांना समज देऊन घरी बसवण्याची जबाबदारी देखील पोलिस पाटलावर आहे. वेळप्रसंगी गावातील व्यक्तींबरोबर वाद होत असून, गाव पातळीवर नागरिक व पाटील यांचे संबंधदेखील खराब होत असल्याचे समजते.

गावोगावचे पाटील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याचे चित्र आहे. मात्र, काही गावांमध्ये ही संपूर्ण जबाबदारी पोलिस पाटलावर ढकलून बाकीचे शासकीय-निमशासकीय कर्मचारी निश्चिंत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT