Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule sakal
पुणे

राष्ट्रवादीमध्ये राजकीय स्फोट होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाकित

सकाळ वृत्तसेवा

बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मला गृहमंत्री पद हवे होते. पण आमच्या वरिष्ठांनी दिले नाही असे वक्तव्य केले.

पुणे - महाविकास आघाडी सरकार मध्ये अजित पवार यांना गृहमंत्री पद हवे होते, त्यांची योग्यता असूनही हे मंत्रीपद दिले गेले नाही. हीच राष्ट्रावादीमध्ये धुसफूस आहे, लवकरच एक दिवस असा येणार की राष्ट्रवादीत राजकीय ब्लास्ट होईल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

बावनकुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मला गृहमंत्री पद हवे होते. पण आमच्या वरिष्ठांनी दिले नाही असे वक्तव्य केले. त्यावरून बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदावर बोट ठेवले. अजित पवार यांना काँग्रेस व शिवसेनेनेही मंत्रीपद देऊ दिले नाही. म्हणून राज्य अडीच वर्ष मागे पडले,असेही बावनकुळे म्हणाले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे बाबत बावनकुळे म्हणाले केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 144 मतदार संघामध्ये मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. त्याच निमित्ताने बारामती मध्ये सितारामन यांचा दौरा झाला. कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठका घेण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये आम्हाला बारामती मध्ये राष्ट्रवादी घड्याळ बंद पाडायचे आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

आदित्य ठाकरे यांचे तळेगांव येथील आंदोलन म्हणजे 'खोटं बोल पण रेटून बोल' असा प्रकार आहे. महाविकास आघाडी सरकारने जागा नक्की केली असेल तर, मग त्यांनी एमओयू घेऊन आंदोलनाला यावे. जागा संपादन केल्याचा शासन आदेश दाखवावा, किती जागा आरक्षित केली त्याची माहिती द्यावी, कंपनीला दिलेली प्रत दाखवावी. खोटारडेपणा सोडा महाविकस आघाडीमुळे दिरंगाई झाली मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत त्यामुळे लवकर निर्णय झाला नाही.

सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता त्यातूनच तळेगावात इव्हेंट मॅनेजमेंट करीत आहेत. तळेगांव कुठे जमीन दिली आहे ते दाखवा. महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचे काम करू, मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.

'पीएफआय'वर बंदी घाला

पाकिस्तान झिंदाबाद म्हनणारे जिथे असतील तेथून शोधून काढू, त्यांच्यावर देशद्रोह गुन्हे दाखल करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणार आहे. आमचे सरकार संवेदनशील सरकार आहे, ही कारवाई नक्की करेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

खडसेंबाबत माहिती नाही

एकनाथ खडसे यांच्या भावेश भाजप प्रवेश बाबत मला कोणतीही माहिती नाही तसेच आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अमित शहा यांना भेटले असतील ते मला माहिती नाही, मात्र राजकारणात काय होईल सांगता येत नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT