पुणे जिल्हा सहकारी दुध संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा केशरताई पवार यांचा सत्कार करताणा गणेश दुध संस्थेचे पदाथिकारी
पुणे जिल्हा सहकारी दुध संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा केशरताई पवार यांचा सत्कार करताणा गणेश दुध संस्थेचे पदाथिकारी sakal
पुणे

पुणे : ११ तारखेपासून गाईच्या दुधाला दोन रुपयांची दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

पुणे : पुणे जिल्हा दुध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्षपदी केशरताई पवार विराजमान होताच तिस-याच दिवशी दुधाला प्रतीलिटर दोन रुपये भाव वाढवून ३५ रुपये एवढा भाव देत असल्याची घोषणा राजुरी (ता.जुन्नर) येथे केली. येत्या ११ तारखेपासून ही दरवाढ सर्व दुध उप्तादकांना दिली जाणार असून जेष्ठ संचालक बाळासाहेब खिलारी व भाऊ देवाडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करुन उपस्थित दुध उप्तादक शेतक-यांच्या त्यांनी टाळ्या वसुल केल्या.

पुणे जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षपदी केशरताई पवार, संचालकपदी बाळासाहेब खिलारी व भाऊ देवाडे यांची निवड झाल्याबद्दल तिघांचाही जाहीर सत्कार राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी व्यावसायिक दुध संस्थेकडून करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाल्या, राजुरी येथील गणेश दुध संस्थेला दुध संकलन व दुध उप्तादकांच्या हितांचा विचार करणारी संस्था म्हणून केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाल्याने या संस्थेचा आदर्श राज्याने घ्यावा. इथे आल्यावर समजले की, ही संस्था शेतक-यांना गाईच्या दुधासाठी ३५ रुपये एवढा भाव देते. मग राज्यात आदर्श असलेल्या कात्रज संघाने का माघार घ्यावी म्हणून सहकारी दोन्ही संचालकांशी चर्चा करुन मी दोन रुपयांची भाववाढ तात्काळ जाहीर करुन ११ तारखेपासून ती अंमलातही आणणार आहे.

यावेळी खिलारी म्हणाले, वाड्यावस्त्यांवरील शेतक-यांच्या हिताचा विचार करणारा कात्रस संघ असून केशरताईच्या नेतृत्वात आम्ही आणखी प्रगती करु. यावेळी शरदचंद्र पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भाऊ देवाडे, माजी सभापती दिपक औटी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके,गणेश दुध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोविंद औटी, सुभाष औटी, तुकाराम डुंबरे, अशोक हाडवळे, ज्ञानेश्वर घंगाळे, लक्ष्मण औटी, निवृत्ती औटी, राजाराम औटी, विशाल हाडवळे, गणेश शिंदे, किरण औटी, सुनिता फावडे, पुष्पा हाडवळे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, राजेंद्र औटी,निवृत्ती हाडवळे ,राजीव औटी,धिरज औटी, व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रईस चौगुले व आभारप्रदर्शन एम.डी.घंगाळे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT