पुणे

दुसऱ्या आठवड्यातही डाळींच्या भावात वाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे : दिवाळीमुळे फराळांचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. बेसन, गहू, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, हरभराडाळ, उडीद डाळीच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. मागणीपेक्षा बाजारात आवक कमी होत असल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. सलग दोन वर्षे कडधान्याचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे डाळींचे भाव नियंत्रणात आले होते. या वर्षी पुन्हा उत्पादन क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांचे उत्पादन घटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद बाजारावर पडले आहे. गेल्या आठवड्यात डाळींच्या भावात मोठी वाढ झाली होती. या आठवड्यात तूरडाळ, हरभराडाळ, उडीद डाळ यांच्या भावात क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली. हीच स्थिती ज्वारी आणि बाजरीची आहे. खरीप हंगामात याचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या भावात वाढ होत आहे. गव्हाच्या दरात प्रतिक्विंटल 50 रुपये, ज्वारी 200 रुपये आणि बाजरीच्या भावात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. हरभराडाळीच्या भावातील तेजीचा परिणाम बेसनाच्या भावावर झाला आहे. भाव पन्नास किलोमागे 50 रुपयांची वाढ झाली आहे. 

पामतेलाची मागणी घटली असून, भावात प्रतिपंधरा लिटर/ किलोमागे 20 रुपयांनी घट झाली. साखरेची आवक चांगली होत असून, मागणी कमी असल्याने क्विंटलमागे भाव 50 रुपयांनी घटला आहे. या आठवड्यात शेंगदाण्याच्या भावात चढ-उतार झाला. सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरेल तेल, मिरची, हळद, तांदूळ आदी मालाची आवक-जावक आणि भाव टिकून आहे. रवा, मैदा, आटा, भंडग, पोहा, खोबरे या मालाच्या मागणीत दिवाळीमुळे वाढ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT