Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh Kumar Sakal
पुणे

Pune News : पब, बार रात्री दीड वाजता बंद करावेत - पोलिस आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील पब, बार, रूफटॉप हॉटेल रात्री दीड वाजता बंद करावेत, अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगासाठी लावलेल्या नियमांबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पब, बार, रूफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट चालकांची बुधवारी (ता. २८) बैठक घेतली. राज्य सरकारच्या नियमानुसार पब, बार, रूफटॉप हॉटेल रात्री दीड वाजता बंद करावेत. बार आणि पब चालकांनी या नियमांचे पालन करावे, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

रेस्टॉरंट॒सला रात्री अकरापर्यंत मुदत आहे. परंतु रेस्टॉरंट॒सला त्रास देऊ नये, अशा सूचना पोलिसांना केली. तसेच, शहरातील ‘नाईट लाईफ’वर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिसरात कलम १४४ लावण्यात आले आहे. याबाबत नागरिकांकडून १५ दिवसांत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पोलिस आयुक्तांच्या या निर्णयाबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि प्रधान सचिव (पर्यटन) जयश्री भोज यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात पोलिस आयुक्तांनी काढलेल्या कलम १४४ च्या आदेशाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

‘हा आदेश अन्यायकारक असून, शहरातील पर्यटन, आदरातिथ्य उद्योगावर दूरगामी आणि हानिकारक परिणाम होऊ शकतात. उद्योगात काम करणाऱ्या सुमारे दहा टक्के लोकसंख्येचा उदरनिर्वाह धोक्यात येण्याची भीती आहे. सरकारने या उपाययोजनांचा पुनर्विचार करावा,’ अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.

‘हॉटेलमध्ये ज्यांना मद्य दिले जाते त्यांनी वाहन चालवू नये, अशी अपेक्षा आहे. दारूचे अतिसेवन आणि दारूच्या नशेत वाहन चालवण्याला अटकाव करण्याची सामाजिक जबाबदारी बार, रेस्टॉरंट॒सची आहे. परंतु अशा तऱ्हेची कायदेशीर तरतूद लादणे अव्यवहार्य आहे,’ असे संघटनेचे उपाध्यक्ष चेतन मेहता यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT