पुणे जिल्हा परिषद
पुणे जिल्हा परिषद sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये हि होणार आता सार्वजनिक शौचालय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहराच्या धर्तीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्येही सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील २९८ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सहा गावांमधील युनिट कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये आठवडी बाजार भरणाऱ्या गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे या मोठ्या गावांमधील बाजाराला आजूबाजूच्या गावांमधून येणाऱ्या नागरिकांची अडचण आता दूर होणार आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या माध्यमातून ही गावोगाव ही सार्वजनिक शौचालये युनिट उभारण्यात येत आहेत. शिवाय गावा-गावातील स्मशानभूमीच्या ठिकाणी आणि महामार्गांवरील गावांमध्ये अशा पद्धतीची सार्वजनिक शौचालये उभारण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे. यासाठी प्रत्येक गावाला प्रत्येकी किमान २ लाख दहा हजार तर, कमाल तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील सार्वजनिक शौचालये युनिट उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३४ गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी २९८ गावांमध्ये या युनिट उभारणीस मंजुरी दिली असून, त्याच्या बांधकामासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आणखी ३३६ गावांमध्येही शौचालये उभारली जाणार आहेत. या सर्व सार्वजनिक शौचालये युनिटच्या उभारणीसाठी सात कोटी पाच लाख ६० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यात स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक शौचालये, शोषखड्डा निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प उभारणी, प्लॅस्टिक व्यवस्थापन युनिट उभारणी आदी स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील स्वच्छता मोहीम दृष्टीक्षेप

  • जिल्ह्यातील गावांची संख्या --- १८७१

  • नगरपालिका, महापालिकेत गेलेली गावे ---४०

  • सार्वजनिक शौचालये युनिटची गावे --- २९८

  • येत्या वर्षात उभारली जाणारी सार्वजनिक शौचालये युनिट --- ३३६

  • आतापर्यंत पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची संख्या --- ४३, ७५०

  • घनकचरा व्यवस्थापन सुरू झालेल्या गावांची संख्या --- ३१७

  • मंजूर केलेल्या युनिटची तालुकानिहाय संख्या

  • आंबेगाव --- २२

  • बारामती --- १४

  • भोर --- २४

  • दौंड --- २९

  • हवेली --- १२

  • इंदापूर --- ३२

  • जुन्नर --- ५७

  • खेड --- १३

  • मावळ --- १०

  • मुळशी --- १३

  • पुरंदर --- १८

  • शिरूर --- ३५

  • वेल्हे --- १९

पुणे जिल्हा एकूण --- २९८

जिल्हा परिषदेच्यावतीने सार्वजनिक शौचालये युनिटच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडीला २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी दोन अशा चार शौचालयांचे युनिट उभारण्यास सांगितले आहे. इतक्या अल्प निधीत हे काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यात ग्रामपंचायतींनी किमान ९० हजार रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने यासाठी निधी वाढवून दिला पाहिजे.

- संतोष ठिकेकर,सरपंच, ठिकेकरवाडी (ता. जुन्नर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT