पुणे

माझा काय संबंध?, बदनाम का करतात?; अजित पवार यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आंबिल ओढ्यालगत सीमाभिंती उभारणीबाबतच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून येत्या शुक्रवारी निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.

पुणे शहरातील विविध प्रश्न, त्यावरील अंमलबजावणी अडथळे आणि उपाय यावर पवार यांच्या उपस्थितीतील मुंबईत बैठकीत चर्चा झाली. तेव्हा बैठक सुरु होताच आंबिल ओढ्याभोवती सीमाभिंत बांधण्याचा विषय आला. त्याचवेळी महापालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या येथील कारवाईचा संबंध नसल्याचे पवार यांनी जाहीर केले. या कारवाईमागे पवार यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याची चर्चा होती. त्यानंतर आंबिल ओढयाभोवती सीमाभींत का बांधली जात नाही, याची विचारणा करीत पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यावर लोकप्रतिनिधींची भूमिका घेऊन घेतल्या आणि नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांच्याशी पवार यांनी सल्लामसलत केली.

पवार म्हणाले, ‘‘पावसाळ्यात आंबिल ओढ्याला पुराचा धोका असल्याने सीमाभिंत बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी त्यातील नेमकी कार्यवाही करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकान्यांशी चर्चा केली जाईल. तेव्हा निर्णय करू.’’ सीमाभिंत बांधण्याचा ठराव झाला तरी, महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याकडे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सचिन दोडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली घुमाळ, नगरसेविका आश्विनी कदम यांनी पवार यांचे लक्ष वेधले.

महापौरांची नाराजी

पुण्यातील समस्यावर पालकमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक असतानाही महापौरांना बोलविले नसल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘ट्विट’वरून नाराजी व्यक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसने या बैठकीला महापौर, भाजप नेत्याना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मात्र, बैठकीत पवार यांनी महापौरांचा उल्लेख करीत, त्यांच्या नात्यातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने ते आले नसल्याचे सांगितले. यानिमित्ताने पवार यांनी महापौराची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. बैठकीसाठी महापैरांना फोन केला होता. मात्र, घरगुती कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत, असे तुपे आणि टिंगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बैठकीच्या निमंत्रणावरून प्रश्‍नचिवन्ह

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली घुमाळ, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्याला पवार यांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते. मात्र, आपल्या डावलून बैठक होत असल्याचे कळताच नगरसेवक सचिन दोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा संदर्भ देऊन बैठकीला बसले तर बैठक असल्याचे सांगत, नगरसेविका अश्विनी कदम यांनी थेट अजित पवार यांना फोन करून बैठकीला हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT