आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 30 जून 2021

Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण षष्ठी, राष्ट्रीय मिती आषाढ ०९, शके १९४३

सूर्योदय: सकाळी ६-०६,

सूर्यास्त: सायं. ७-१९,

चंद्रोदय: रात्री १२-०६,

चंद्रास्त: सकाळी ११-२२,

दिनविशेष

१९१७ : काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचे निधन. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होत.

१९८५ : गोवा विद्यापीठाचे उद्‌घाटन.

१९९२ : प्रसिद्ध मराठी साहित्यिक, वक्ते व समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.

१९९४ : नाटककार, अभिनेते, निर्माते आणि कवी बाळ कोल्हटकर यांचे निधन. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ आणि ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही त्यांची विशेष गाजलेली नाटके होत.

१९९७ : प्रसिद्ध शास्त्रोक्त व नाट्य संगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन. त्यांनी सुमारे २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर ‘संगीत सौभद्र’ नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.

Horoscope and Astrology
साप्ताहिक राशिभविष्य (२७ जून २०२१ ते ३ जुलै २०२१)

दिनमान

मेष : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : वादविवाद टाळावेत. भागीदारीतील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कामे मार्गी लावू शकाल.

मीन : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com