corona  sakal
पुणे

पुणे : पावणे दोन वर्षात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२०) दिवसभरात १४ हजार ४२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२०) दिवसभरात १४ हजार ४२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील सुमारे पावणे दोन वर्षात गुरूवारी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दिवसातील नवीन उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याऊलट ८ हजार ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य अकरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (Pune District Corona Patient Update)

जिल्ह्यातील दिवसांतील एकून नवीन रुग्णांपैकी निम्म्‍याहून अधिक रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. शहरात दिवसात ७ हजार २६४ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ४ हजार ९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार १०४, नगरपालिका हद्दीत ७०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ५७५, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २७१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २४४, नगरपालिका हद्दीतील २६९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३०६ जण आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि पिंपरी चिंचवड व नगरपालिका हद्दीतील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात एकूण ७८ हजार ८४६ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून २ हजार ६९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित ७६ हजार १५० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT