कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिनोम सिक्वेंसिंगच्या पाच लॅब ठप्प; काय घडलंय नक्की? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona testing lab
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिनोम सिक्वेंसिंगच्या पाच लॅब ठप्प; काय घडलंय नक्की?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जिनोम सिक्वेंसिंगच्या पाच लॅब ठप्प; काय घडलंय नक्की?

नवी दिल्ली : देशात आता कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) आली आहे, यावेळी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं (Omicron Variant) धुमाकूळ घातला आहे. अशातच कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग (genome sequencing) करण्यात अडचण निर्माण झाली आहे. जिनोम सिक्वेंसिंग करणाऱ्या देशातील एकूण ३८ पैकी पाच लॅबचं काम ठप्प झालं आहे. कारण सध्या यासाठी लागणारा रिएजंटचा (reagent) सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. टाइम्स नाऊ न्यूजनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. (Shortage of reagents affect genome sequencing in India some labs stop functioning)

हेही वाचा: ...तर प्राण्याच्या पिल्लांना 'चंपा' आणि 'चिवा' अशी नाव ठेऊ - महापौर पेडणेकर

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निधीचा अभाव असल्यानं प्रयोगशाळांमध्ये रासायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या रिएजंटची खरेदी रखडली आहे. त्यामुळं लॅबमध्ये होणाऱ्या जिनोम सिक्वेंसिंगला अडचणी येत आहेत. जिनोम सिक्वेसिंग हे कोरोना विषाणूमधील म्युटेशन शोधण्यासाठी गरजेचं असतं. निधीच्या अभावामुळं निर्माण झालेल्या या अडचणीमुळं गेल्या महिन्याच्या तुलनेत ४० टक्के नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग रखडलं आहे. इतकंच नव्हे तर नॅशनल सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल इथं देखील रिएजन्टचा तुटवडा आहे पण तरीही तिथं जिनोम सिक्वेंसिंग काही प्रमाणात सुरु असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

हेही वाचा: निर्भया गँगरेप केसच्या वकील सीमा कुशवाह यांचा 'बसपा'त प्रवेश

भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानंतर आत्तापर्यंत २५ हजार नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग पार पडलं आहे. पण दिवसेंदिवस भारतात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. देशात सध्या ३,१७,५३२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ९,२८७ ओमिक्रॉनबाधितांची संख्या आहे. कालपर्यंत ही आकडेवारी ३.६३ टक्के वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

Web Title: Shortage Of Reagents Affect Genome Sequencing In India Some Labs Stop Functioning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..