Pune Drug Case
Pune Drug Case eskala
पुणे

Pune Drug Case: पुणे पोलिसांचा FDA, MIDC सोबत पत्रव्यवहार; कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाईच्या सूचना

Sandip Kapde

Pune Drug Case: पुणे ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार केला आहे. कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी या पत्रात केल्या आहेत. तिन्ही विभागांना तेथे कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कुरकुंभ येथील मेफेड्रॉन निर्मिती करणार्‍या अर्थ केम लॅबोरटरीज् कंपनीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी प्रदूषन नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न औषध प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार केला.

कुरकुंभ येथे इतर केमीकल उत्पादनाच्या नावाखाली येथे अमली पदार्थ तयार करण्यात उद्योग सुरू होता. यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत दोन कंपन्यात अमली पदार्थ तयार केले जात असल्याचे पुढे आले होते.

त्यानंतर देखील औद्योगिक विकास महामंडळ, प्रदुषन नियंत्रण महामंडळ आणि एफडीए यांच्या हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही, हा देखील एक मोठा सवाल आहे. पोलिसांनी अर्थ केम लॅबोरटरीज् ही कंपनी सील केली आहे. (Pune Crime News)

इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसी, पुण्यातील एका कारखान्यावर छापा टाकून 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांची आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. एका कारखान्याच्या मालकाला पोलिसांनी डोंबिवली येथून 20 फेब्रुवारीला सकाळी ताब्यात घेतले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरासह देशातील विविध शहरात छापेमारी मोहीम सुरू केली आहे. कारखान्याचे मालक आणि कुरकुंभचे रासायनिक तज्ज्ञ पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT