पुणे

पुण्यात कचरा उचलताना नाकीनऊ; महापालिका प्रशासनाला चिंता

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दक्षिणेकडील दौऱ्यादरम्यान ‘बीच’ प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा ‘सोशल मीडिया’वर होत आहे. पुण्यात मात्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेला पावसाने झोडपले आहे. कचरा उचलताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.  

या मोहिमेत अव्वल ठरण्यासाठी चकाचक केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे गेल्या तीन दिवसांत साडेतीनशे टन कचरा वाहून आला आहे, तो तातडीने उचलण्यात येत असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी रविवारी सांगितले.  स्वच्छ भारत मोहिमेत बाजी मारण्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. शहरातील रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठी सुमारे १० हजार कर्मचारी काम करीत आहेत. स्वच्छतेबाबत पुणेकरांकडून रोज अभिप्रायही घेण्यात येत आहे. ही मोहीम पुढे सरकत असतानाच पावसाने मात्र खोडा घातल्याचे चित्र आहे. 

मुळा-मुठेच्या पात्रासह ओढे-नाले तुंबल्याने त्यातील विशेषतः प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर येत आहे. लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा ताफा तिकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांची साफसफाई करताना प्रशासनाला कसतर करावी लागत आहे. पावसामुळे भीषण स्थिती निर्माण होत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांना हातातील कामे सोडावी लागत असल्याची तक्रार आहे. पावसाचा मुक्काम वाढल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीची चिंता प्रशासनाला भेडसावत आहे.

स्वच्छ मोहिमेबाबत महापालिकेने काही ठिकाणी भिंती रंगविल्या आहेत. त्यातून ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’चा संदेश देण्यात आला. मात्र, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या भिंतींवरील रंगरंगोटीही खराब झाली आहे. काही भिंतींवर चिखल माखल्याने जागृतीचा उद्देश पुसला गेला आहे. 

सततच्या पावसामुळे रस्त्यांवर कचरा वाहून येत आहे. वर्दळ असलेल्या रस्त्यांवर तो पडल्याने लगेचच उचलावा लागत आहे. मात्र, पुरेसे कामगार नेमून सर्वत्र स्वच्छता राखण्यात येत आहे. बेजबाबदार कामगार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT