Pune-Mumbai Road
Pune-Mumbai Road sakal
पुणे

Pune : बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; ६३ घरांवर पुणे महापालिकेकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Pune : जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणास अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असणाऱ्या बोपोडी येथील एका इमारतीसह ६३ घरांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमध्ये घरे पाडून रस्ता रुंदीकरणामधील अडथळा दूर करण्यात आला. कारवाई झालेल्या घरमालकांचे यापूर्वीच नुकसान भरपाईसह पुनर्वसन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील हॅरिस पुलापर्यंतचे पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत बोपोडी येथे काही घरे, इमारती रस्ते रुंदीकरणाच्या कारवाईमध्ये अडथळा ठरत होती. परिणामी संबंधित ठिकाणावर रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा वेग मंदावत होता. ऐन रहदारीच्यावेळी बोपोडी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्न केला जात असतानाच पर्यायी घरे, नुकसान भरपाई अशी वेगवेगळी कारणे पुढे करून काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी विलंब झाला होता.दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी सकाळी सात वाजता मोठ्या पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाईला सुरुवात झाली. चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या ६३ मिळकती जमीनदोस्त केल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. या कारवाईमध्ये साडेचार हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेतली.

भूसंपादनाची कारवाई सुरु असतानाच रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

-विकास ढाकणे,अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT