Cylinder Blast
Cylinder Blast 
पुणे

Cylinder Blast : सिलेंडर स्फोटात चार जण जखमी

किरण भदे

नसरापूर : भोर येथे घरातील स्वयंपाकासाठी वापरावयाचा सिलेंडर गँसचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत घरातील चार जण जखमी झाले असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत.

वरवे खुर्द येथे झालेल्या या घटनेत घरा मधील जालिंदर नारायण जाधव वय .. जाधव यांची भाची रिध्दी संदिप शितोळे वय 6 भाचा यश मोहन ताकवले वय 11 व घरात आलेले पाहुणे संदीप बाळासाहेब कदम वय 34 सर्व राहणार वरवे खुर्द ता.भोर हे चौघे जखमी झाले असुन या मधील जालिंदर जाधव हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार चालु आहेत रिध्दी शितोळे ही देखिल जास्त जखमी झाली असुन तीच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे उपचार चालु आहेत तर इतर दोघांवर शिवापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत.

जालिंदर नारायण जाधव मुळ गाव कांजळे ता.भोर असुन त्यांची वरवे येथे बसस्टाँप जवळ खानावळ असुन तेथेच ते राहतात ता. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जालिंदर जाधव यांनी गँस शेगडीवर चहा करण्यासाठी गँस चालु केला परंतु गँस लायटर लगेचच सापडला नाही तो पर्यंत गँस घरामध्ये पसरला होता थंडीमुळे घराच्या दारेखिडक्या पुर्ण बंद असल्याने चालु केलेला गँस संपुर्ण घरात कोंडला गेला त्यानंतर लायटर सापडल्याने तो पेटवताच कोंडलेल्या गँसचा मोठा स्फोट झाला त्या मध्ये घरातील चौघे जखमी झाले तर काही वस्तुंनीही पेट घेतला.

घटना समजताच शेजारी राहणारे लोकेश मोरे यांनी शेजारीच राहणारे दुसरे शेजारी संदिप थोपटे यांना फोन करुन त्यांच्या मदतीने मोरे यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेले. संदिप थोपटे यांनी या बाबत राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पुढील तपास पोलिस हवालदार एस बी चव्हाण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT