जुन्नरला शेतकरी संघटनेचे आंदोलन; वीज बिलांची केली होळी
जुन्नरला शेतकरी संघटनेचे आंदोलन; वीज बिलांची केली होळी 
पुणे

जुन्नरला शेतकरी संघटनेचे आंदोलन; वीज बिलांची केली होळी

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर येथील आंबेडकर पुतळा ते तहसीलदार कार्यालय दरम्यान मोर्चा काढून शेतकरी संघटनेने वीज बिलांची आज (शुक्रवार) दुपारी होळी केली.

शेतकरी संघटनेच्या (रंगुनाथदादा पाटील प्रणित) वतीने जुन्नर तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतमालाच्या उत्पादन खर्चामध्ये वीजबिल धरले नाही. महाराष्ट्र सरकार महावितरणला सन 2005 पासून 24 तासापैकी 16 तासाचे वीज बिल कलम 65 नुसार महावितरणला अनुदान म्हणून देते असे असताना 16 तासांचे अनुदान देऊन वीज पुरवठा 8 तासंचाच केला जातो. याउलट 8 तासांचे अनुदानाची रक्कम महावितरण कडे जमा आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारा विषयी सरकारला जाग यावी म्हणून जुन्नर येथील आंबेडकर पुतळा ते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढून वीज बिलाची होळी करण्यात आली. विजबिलांच्या थकबाकीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज जोड तोडू नये. जळालेली रोहित्रे ताबडतोब बदलून वीजपुरवठा पूर्ववत करावा, विद्युत वाहक तारांची दुरुस्ती करावी इत्यादी मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार रवींद्र वळवी यांना देण्यात आहे.

यावेळी रमेश हांडे शेकाप पुणे जिल्हा सेक्रेटरी तसेच संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी नांदखिले क्रांतिसिह नाना पाटील संघटना तसेच शेतकरी संघटना (रंगुनाथ दादा पाटील प्रणित) जेष्ठ नेते, अजित वाघ जुन्नर तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना (रंगुनाथ दादा पाटील प्रणित), राजेंद्र ढोमसे संस्थापक अध्यक्ष शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, लक्ष्मण शिंदे जिल्हा युवा उपाध्यक्ष शेतकरी संघटना कृषिनिष्ठ शेतकरी जितेंद्र बिडवई शेतकरी उपस्थित होते.

उपस्थितांनी भाषणामध्ये सांगितले की, शेतकऱ्यांना फक्त 08 तास वीज दिली जाते. योग्य दाबामध्ये विजेचा पुरवठा होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, असे आवाहन केले. हे सरकार शेतकऱ्यांना फसवीत आहे. सरकारने अनेक योजना आणल्या आहेत, परंतु त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होतच नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सरकार मुद्दाम शेतकऱ्यांच्या शेतमालावर निर्यातबंदी लावत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT