lok adalat
lok adalat  sakal
पुणे

Pune News : अपघाती मृत्यू झालेल्या नोकरदाराच्या कुटुंबीयांना एका वर्षात न्याय

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अपघातात मृत्यू झालेल्या सरकारी नोकरदाराच्या कुटुंबीयांना एका वर्षात नुकसान भरपाई मिळाली आहे. कुटुंबीयांना ८६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोक अदालतमध्ये तडजोडी अंती झाला.

विक्रम (नाव बदललेले) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे सरकारी नोकरदाराचे नाव आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते कारने सोलापूरवरून मुंबईला निघाले होते. इंदापूरमध्ये त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात विक्रम हे गंभीर जखमी झाले होते.

उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. विक्रम यांची पत्नी, आई आणि दोन मुलांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात गो-डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा केला होता.

ॲड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला होता. मृत्यू झाला तेव्हा त्याचे वय ४९ होते. त्यांना दरमहा ६० हजार रुपये पगार होता. पत्नी, दोन मुले आणि आई त्यांच्यावरच अवलंबून आहेत. त्याचा विचार करून सव्वा कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली.

मात्र, ८६ लाख रुपयांवर लोक अदालतमध्ये तडजोड झाली. या तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील ॲड. जी. पी. शिंदे, विमा कंपनीचे वकील ॲड. सुनील द्रविड आणि विमा कंपनीचे अधिकारी सुखप्रीत सिंह आणि‌ अर्मिता सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT