पुणे

वाहन ‘पासिंग’साठी ‘आरटीओ’चा भुर्दंड

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सासवड येथील दिवे येथे उभारण्यात आलेल्या नवीन टेस्ट ट्रॅकवर सोमवारपासून वाहन योग्यता चाचणीच्या कामास सुरवात झाली. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात वाहन तपासणीसाठी शुल्क भरून घेतलेल्या अपॉइंटमेंटधारकांनाही नव्याने अपॉइंटमेंट घ्यावी लागत असून, त्यासाठी पुन्हा शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वाहन योग्यता चाचणीसाठी (पासिंग) पुरंदर तालुक्‍यातील दिवे येथे उभारलेल्या टेस्ट ट्रॅकवर प्रायोगिक तत्त्वावर पासिंगचे काम आपासून सुरू झाले. त्यासाठी वाहनधारकांना ‘परिवहन’च्या वेबसाइटवरून अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. या ट्रकवर प्रत्येकी पन्नास वाहनांची चाचणी घेतली जाणार आहे.

आरटीओच्या आळंदी रस्ता येथील कार्यालयात वाहनांचे पासिंग केले जात असताना, आरटीओ प्रशासनाने अपॉइंटमेंटची पद्धत सुरू केली होती. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत एका दिवशी पासिंग केल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होती. त्यामुळे अपॉइंटमेंट घेतल्यानंतर संबंधितांना काही आठवड्यांनंतरची तारीख मिळाली होती. ही अपॉइंटमेंट घेताना अर्जदाराकडून शुल्क आकारण्यात येत होते.

आळंदी रस्ता येथील पासिंग बंद झाले, त्या वेळी अनेक वाहनधारकांनी शुल्क भरून अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र त्यानंतर पासिंगचे कामकाज बंद झाले. आजपासून हे काम पुन्हा सुरू झाले आहे. मात्र ऑक्‍टोबरमध्ये शुल्क भरून अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना, तांत्रिक अडचणीमुळे जुन्या शुल्काच्या पावतीवरून अपॉइंटमेंट मिळत नाही. त्यासाठी पुन्हा शुल्क भरावे लागत आहे. ही तांत्रिक अडचण सोडवून वाहनधारकांची गैरसोय टाळावी आणि आर्थिक भुर्दंडातून सुटका करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT