पुणे

पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये; गुंडाला शहरात राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई 

सकाळवृत्तसेवा

पुणे ः कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड शरद मोहोळ यास पुणे पोलिसांनी दोन महिन्यांसाठी शहरात वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

गुरूवार पेठेमध्ये 26 जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास पतीत पावन संघटनेच्यावतीने सुवर्णमहोत्सवी वर्ष वर्धापनदिनानिमित्त एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास गुंड शरद मोहोळ हा त्याच्या साथीदारांसमवेत कार व दुचाकी अशा वाहनांद्वारे आला होता. त्या ठिकाणी त्याने दहा ते 12 साथीदारांसह बेकायदेशीर गर्दी करुन आरडाओरडा केला होता.

मोहोळ व त्याचे साथीदार तेथे आल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहीलेले अन्य नागरीक भितीने तेथून पळून गेले. तेथे मोहोळ व त्याच्या साथीदारांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे मोहोळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोहोळच्या 16 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

मोहोळ हा येरवडा कारागृहातुन नुकताच निर्दोष सुटला असून तो आपल्या टोळीची दहशत पुन्हा निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता.

त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधीत प्रस्तावाल मंजुरी देत मोहोळला दोन महिन्यांसाठी शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यास सक्त मनाई करण्यात आला आहे, असा आदेश रविवारी काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT