bike taxis
bike taxis  Sakal
पुणे

Pune : RTO कडून ६४० बाईक टॅक्सींवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिक्षा संघटनांकडून जोरदार विरोध होत असलेल्या बाईक टॅक्सी चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुरू केलेला कारवार्इचा बडगा अद्याप सुरू आहे. आरटीओकडून आत्तापर्यंत ६४० बार्इक टॅक्सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. कारवार्इची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर या दुकाची चालकांना परत करण्यात आल्या आहेत.

बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवत दुचाकी चालकांकडून दंडासह वाहतुकीचा कर ही वसूल केला जात आहे. वाहन परमीट नियमानुसार एका सिटप्रमाणे ३०६ रुपयांचा कर आकारण्यात येत आहे. तसेच, दुचाकी मालक व्यवसाय करीत असेल तर गाडीचे कागदपत्रे सादर करून त्याला १० ते २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, तर दुचाकी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली असेल तर चालकाला २० ते ३० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने दुचाकीचालकांनी बाईक टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बाईक टॅक्सीमुळे सोसावी लागत असलेली आर्थिक झळ थांबावी यासाठी ही सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्या असून वारंवार तीव्र आंदोलन करीत आहेत. बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंदी आणावी, या मागणीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी एकत्र येत आरटीओ कार्यालयासमोर सोमवारी चक्का जाम आंदोलन केले होते. हजारो रिक्षाचालक त्यात सहभागी झाले होते.

कारवाई होत असल्याने बाईक टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ६४० दुचाकींवर कारवार्इ करण्यात आली असून त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढील काळात आणखी कडक कारवार्इ करण्यात येणार आहे.

अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT