Pune Traffic
Pune Traffic Sakal
पुणे

Pune Traffic : कोलवडी-केसनंद रस्त्यावर दर्गा चौकात वाहतुकीला धोका

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द : कोलवडी (ता. हवेली) येथील शहनशावली दर्गा चौकात मांजरी खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र चढ असल्याने हा चौक वाहतुकीला धोकादायक झाला आहे. येथे वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यावर उपाययोजना करण्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

केसनंद-थेऊर रस्त्याचे रूंदीकरण, डांबरीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण असलेले दिसत आहे. कोलवडी येथील दर्गा चौकात सुमारे चार-पाच फुटापर्यंत रस्ता भरून घेतला आहे. त्यामुळे या चौकातून मांजरीकडे वळताना तीव्र उतार झाला आहे. हा उतार भरून काढण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असतानाही केवळ तात्पुरती डागडुजी करून सोडून देण्यात आले आहे. याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठा खड्डाही आहे. येथून मांजरीकडे जाणाऱ्या व मांजरीकडून येणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मांजरीकडून मुख्य चौकातील रस्त्यावर येताना तीव्र चढ निर्माण झाला आहे. वाहनांना येथे येऊन मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज घेताना थेट चढावरच थांबावे लागते. पुन्हा पुढे जाताना वाहन बंद पडणे किंवा थेट मुख्य रस्त्यावर अचानक जाणे यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक येथे अनेकवेळा पलटले आहेत. ऊसवाहतूक करणारे ट्रॅक्टर या चढावरून चढत नसल्याने तीन ट्रॅक्टर जोडून ते ओढावे लागत आहे. यामध्ये मुख्य रस्त्यावर होणाऱ्या वाहतुककोंडीबरोबरच अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.

"आमच्या घर परिवारातील या रस्त्यालगत तीनचार ठिकाणी जमीन आहे. रस्ते विकासात आम्ही व येथील शकते तकऱ्यांनी चांगगले सहकार्य केलेले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्याचा ठेकेदार ठरलेले कामही व्यवस्थित करीत नाहीत. सूचना फलक नाहीत, धोक्याच्या ठिकणी ब्लिंकर नाहीत, विजेचे खांब धोकादायक आहेत, काही ठिकाणी साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत, कठडे नाहीत, पदपथ व्यवस्थित नाहीत. मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार केलेला आहे. याबाबत वारंवार ठेकेदार व अधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे.'

मिलापचंद गायकवाड पाटील, ग्रामस्थ, कोलवडी

"कोलवडी-केसनंद या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अवजड व इतर वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. त्यामुळे येथे वारंवार छोटेमोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्दळीच्या ठिकाणी व चौकात ब्लिंकर, सूचनाफलक तसेच रँबलर बसविणे आवश्यक आहे. असे न केल्यास ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल.'

विकास गायकवाड पाटील, ग्रामस्थ, कोवडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT