Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे : अस्वच्छ स्वच्छतागृहावरून प्रशासनाची झाडाझडती

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे महापालिकेचे स्वच्छतागृह बाहेरून चकाचक अन आतून प्रचंड घाण अशी अवस्था आहे.

पुणे - पुणे महापालिकेचे स्वच्छतागृह (Toilet) बाहेरून चकाचक अन आतून प्रचंड घाण (Uncleaned) अशी अवस्था आहे. तरीही घनकचरा विभागाकडून, क्षेत्रीय कार्यालयाकडून सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीकडे (Repairing) दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे पडसाद महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत उमटले. प्रशासनाची (Administrative) झाडा झडती घेत स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेसाठी काय करता?, केवळ ठराविक ठिकाणी स्वच्छता करून स्पर्धेत बक्षीस मिळवत असल्याची टीका केली. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने आता दिवसातून तीन वेळा स्वच्छतागृह साफ करण्याचे आदेश दिले आहेत.

`सकाळ’ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे नगरसेविकांनी प्रशासनाची चांगलीच झडती घेतली. पुणे महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात पाचवा क्रमांक आलेला आहे. त्यामुळे पुणे शहर स्वच्छ असल्याचे सांगितले जाते. पण शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतागृह बांधण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करतात. स्वच्छतागृहाला महागड्या टाईल्सच्या फरश्या, रंगरंगोटी, नळकोंडाळे बसवतात पण त्यानंतर त्याच्या सुरक्षेकडे व स्वच्छतेकडे नगरसेवक आणि प्रशासन लक्ष देत नाही. केवळ दरवर्षी ठराविक रक्कम स्वच्छतागृहांच्या बांधकाम व इतर कामांवर खर्ची पाडण्यामध्ये रस असतो.

शहरातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचा प्रश्‍नही गंभीर आहे. मुख्य बाजारपेठेसह इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आली, पण तेथे वीज नसणे, पाणी नसणे, दार व खिडक्या तुटलेल्या असणे, दुर्गंधी व अस्वच्छता असल्याने महिलांना त्याचा वापर करता येत नाही. क्षेत्रीय कार्यालयांनी त्याची देखभाल करणे अनिवार्य असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत यावरून नगरसेविकांनी प्रशासनाकडून दुर्लक्ष का केले जाते याचा जाब विचारला गेला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी स्वच्छता व दुरुस्तीकडे आमचे लक्ष असते असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त झालेल्या नगरसेविकांनी ‘सकाळ’च्या बातमीचा दाखला देत प्रशासनाचे डोळे उघडले. त्यावेळी झालेली चूक मान्य करत स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेसाठी व सुरक्षेसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले जातील असे आश्‍वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी याबाबत लेखी आदेश काढले.

‘शहरातील स्वच्छतागृहे घाण झालेली असली तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रशासनाच्या कामावर नगरसेविकांनी नाराजी व्यक्त करत सुमारे एक तास चर्चा केली. नगरसेविकांनी महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सांगितलेल्या सूचनांच्या आधारे प्रशासनाने स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी आदेश काढले आहेत. त्यानुसार त्यांना काम करणे बंधनकारक आहे.’

- रूपाली धाडवे, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती

प्रशासनाकडून हे केले जाणार

- दिवसातून तीन वेळा स्वच्छतागृह स्वच्छ केले जाणार

- त्याची नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी लागणार

-वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी वस्ती इतर ठिकाणच्या स्वच्छतागृहांची पाहणी करावी.

- वीज, पाणी, हँडवॉश, डस्टबीनची सुविधा असावी

- हात धुण्यासाठी बेसिन, दरवाजा, खिडक्या, कडी कोयंडे याची दुरुस्ती करावी

- दुर्लक्ष केल्यास विभागीय उपायुक्त जबाबदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT