Khadakwasala Dam
Khadakwasala Dam Sakal
पुणे

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात तुलनेत अर्धा टीएमसीची घट

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खडकवासला प्रकल्पातील (Khadakwasla Project) चार धरणांमध्ये (Dam) सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा (Water Storage) कमी आहे. गतवर्षी २४ ऑगस्ट रोजी प्रकल्पात २८.४८ टीएमसी पाणीसाठा होता. तो यावर्षी मंगळवारअखेर २७.८८ टीएमसी इतका असून, सुमारे अर्धा अब्ज घनफुटांनी (टीएमसी) तो कमी आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला चारही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर होती. परंतु ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली आहे. सध्या वरसगाव आणि पानशेत या दोन्ही धरणे पूर्ण भरलेली आहेत. तर, टेमघर धरणात पाणीसाठा ९० टक्क्यांच्या जवळपास आहे. खडकवासला धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु या धरणातील पाणीसाठा आता निम्म्यावर म्हणजे एक टीएमसी इतका झाला आहे.

उजनी धरणात

उजनी धरणात आजअखेर ३३.४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या ६२.३५ टक्के इतका आहे.

धरणांतील मंगळवारपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

  • टेमघर ३.३३ (८९.७७)

  • वरसगाव १२.८२ (१००)

  • पानशेत १०.६५ (१००)

  • खडकवासला १.०७ (५४.३९)

  • पवना ८.३४ (९८)

  • भामा आसखेड ६.९१ (९०.१८)

  • नीरा देवघर ११.७३ (१००)

  • भाटघर २१.५० (९१.४९)

  • वीर ८.१५ (८६.५९)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Update: दिवसभरात देशविदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT