Rohit Pawar 
पुणे

रोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक

गजेंद्र बडे

पुणे : राज्यातील पंचायतराज संस्थाचे सदस्य असलेल्या आणि नुकत्याच विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, बीड जिल्हा परिषदेतील सदस्य संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे आदींसह अनेकांचा समावेश आहे.

दरम्यान, या जागा रिक्त झाल्याचे संबंधित जिल्हा परिषदांनी आपापल्या जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे कळवले आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेनेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना कळविले आहे.

पंचायतराज संस्थांमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व १९६१ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम ४१ नुसार तर, पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व याच कायद्यातील कलम ५८ (१इ) नुसार आपोआप संपुष्टात येते. मात्र यासाठी संबंधित सदस्यांचे आमदारपदी निवडून आल्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध होणे अनिवार्य आहे. याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागानेही ३० मार्च १९९५ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेले आहे.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे या सर्वांचे पंचायतराज संस्थांवरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील रोहित पवार हे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Wife Mental Harassment Case : घरात झाडू मारतो, भांडी घासतो, तरीही बायको मारहाण करते... तरुणाने व्हिडिओ शेअर करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT