नकटं असावं पण, धाकटं असू नये; शिवसेनेला आला प्रत्यय 

रविराज गायकवाड 
Monday, 11 November 2019

उद्धव ठाकरेंची भूमिका योग्यच
मुख्यमंत्र्यांनी खोटेपणाचा आरोप केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला आधीच का ठरवावा, यामागची भूमिका सांगितली. 'ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानं गेलं तर, एकमेकांच्या जागा पाडण्यात शक्ती वाया जाते,' अशी भूमिका ठाकरे यांनी अमित शहांपुढे मांडल्याचं सांगितलं. ही भूमिका अत्यंत योग्य आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होण्यामागं काही ठिकाणी पाडापाडीचं राजकारणही कारणीभूत होतं. 

जवळपास तीन दिशकं शिवसेनेसोबत असलेला संसार केवळ अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीच्या मोहापायी तुटला. भाजपच्या हिंदुत्वाच्या धाग्यावर जोडला गेलेला देशातील एकमेव मित्रपक्ष शिवसेना. बाकीचे सर्व मित्रपक्षभाजपशी त्या त्या राजकीय परिस्थितीत जुळवून घेतात. भाजपही त्यांच्याशी त्यावेळी जूळवून घेतो आणि वेळ आली की डच्चूही देतो. असाच अनपेक्षित धक्का भाजपनं शिवसेनेला महाराष्ट्रात दिला. इतक्या प्रदीर्घ काळाच्या युतीनंतर अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं औदार्य भाजपनं दाखवलं नाही. त्यामुळं अखेर धाकटा भाऊ ठरवलेल्या शिवसेनेनं हक्काची वाटणी मागितली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपशी काडीमोड घेतलेले देशभरातील पक्ष
बिहार-संयुक्त जनता दल 
ओडिशा-नवीन पटनाईक
आंध्र प्रदेश - तेलुगू देसम पार्टी
जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीर पिपल्स डेमॉक्रेटिक पार्टी 
उत्तर प्रदेश - बहुजन समाज पार्टी 
कर्नाटक - धर्मनिरपेक्ष जनता दल

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

मोदी लाटेनंतर काय घडलं? 
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षासारख्या पक्षानंही भाजपच्या सोबतीनं सत्ताही भोगली. पण, ती आघाडी दर्घकाळ टीकली नाही. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि महाराष्ट्रात शिवसेना हे दोनच पक्ष भाजपचे दीर्घकाळ राहिलेले मित्रपक्ष आहेत. त्यात शिवसेना हिंदुत्वाच्या धाग्याने जोडलेली आहे. अनेकदा शिवसेनेचं हिंदुत्व भाजपपेक्षा अधिक जहाल आहे. तसचं ते सर्वसमावेशक म्हणजेच, बाराबलुतेदारांना सामावून घेणारं आहे. हे शिवसेनेसाठी चांगलं असलं तरी, याची भाजपला कायम भीती वाटत राहिली आहे. मुळात भाजपचील ताकद, त्यांचं राजकारण मोदी लाटेच्या आधी आणि मोदी लाटेच्या नंतर असं करायला हवं. कारण, मोदी पूर्वी महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेला शिवसेना, अचानक छोटा भाऊ झाला आणि 'नकटं असावं पण धाकटं असू नये', याचा प्रत्यय शिवसेनेला आला. पाच वर्षे धाकटं पण सोडल्यानंतर आता या धाकट्या भावाला वेगळं रहायचंय. स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय यात त्याची काय चूक? अर्थात एकाच घरात वाढलेली भावडं जसं सणवाराला कुटुंब एकत्र येतं, तशी कधी एकत्र येतील सांगता येत नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतरही हे सभागृहात वेगळेवेगळेच आले होते. पण, नंतर एक झाले.  

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत

उद्धव ठाकरेंची भूमिका योग्यच
मुख्यमंत्र्यांनी खोटेपणाचा आरोप केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला आधीच का ठरवावा, यामागची भूमिका सांगितली. 'ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानं गेलं तर, एकमेकांच्या जागा पाडण्यात शक्ती वाया जाते,' अशी भूमिका ठाकरे यांनी अमित शहांपुढे मांडल्याचं सांगितलं. ही भूमिका अत्यंत योग्य आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होण्यामागं काही ठिकाणी पाडापाडीचं राजकारणही कारणीभूत होतं. 

शिवसेना योग्यवेळी बोलली
हातपाय पसरण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत घ्यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचं, असा प्रकार भाजपनं जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये केला. त्यातच गेल्या पाच वर्षांत केंद्रातील एकहाती सत्तेमुळं हे प्रादेशिक मित्रपक्षही दबावाखाली होते किंबहुना आहेत. पण, अंतर्गत खद् खद् कायम आहे. मोदी-शहांच्या कार्यपद्धतीवर भाजपमध्येही अंतर्गत नाराजी आहेच. ती बाहेर पडत नाही एवढचं. तसच प्रदेशिक पक्षाचंही आहे. विधानसभेला कमी जागांवर बोळवण होऊनही शिवसेना गप्प बसली. पण, योग्य वेळी बोलली हे महत्त्वाचं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raviraj Gaikwad writes about Shivsena stand in Maharashtra politics