esakal | रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut tweet about government formation in Maharashtra

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच आज (सोमवार) सुटणार हे निश्चित असून, शिवसेनेला आज सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत रास्ते की परवाह करुँगा ते मंजिल बुरा मान जाएगी असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्री आमचाच होणार असा निर्धार केलेल्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने जाण्याची शक्यता वर्तविली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून तसे संकेत दिले आहे. “रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…,”असं ट्विट करून राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे सुतोवाच दिले आहेत. 

भाजपची माघार; लक्ष शिवसेनेकडे

भाजपा-शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्रीपदारून दुभंगल्यानं भाजपानं सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेने जनादेशाचा अपमान केल्याचेही पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

loading image
go to top