Rupali Patil Thombre Sakal
पुणे

वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वसंत मोरे हे जन सामान्यांमध्ये सहभागी होऊन प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली आहे. यानंतर पुण्यासह राज्यातील मनसेमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहण्यास मिळत आहे. मोरे यांच्यावरील कारवाईनंतर मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी या सर्वावर प्रतिक्रिया दिली आहे. (Rupali Patil Thombre Reaction On Vasant More)

त्या म्हणाल्या की, वसंत मोरे हे जन सामान्यांमध्ये सहभागी होऊन प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी असून, मी स्वतःदेखील त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. मात्र, ज्या प्रकारे मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यातआले आहे ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेल्याचा आरोपही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. मी देखील अशाच राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडले, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या. वसंत मोरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या काळजीतून भोंग्यांबाबतच्या भूमिकेला विरोध केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापूर हादरलं! 'मोक्या'तील गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार; रिंग रोडवर तणाव, नेमकं काय घडलं?

Double Decker Bus: पुण्यात दिसणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस! मंगळवारपासून शहरातील 'या' रस्त्यांवर धावणार

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT