sandip
sandip 
पुणे

भावाच्या लग्नावरून परतणाऱ्या संदीपचा अपघाती मृत्यू

रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक : भावाच्या लग्नावरून माघारी घरी जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, दिवसभर लग्नात मिरवणाऱ्या भावाचा मृत्यू झालेल्याने, दिवसभर आनंदात असणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी (ता. 5) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. संदीप अर्जुन जाधव (रा.कशाळ वय 26) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. 

कशाळच्या संदीप जाधवच्या भावाचे लग्न कल्हाटच्या करवंदे परिवारातील नववधूशी कामशेतच्या गुरुदत्त मंगल कार्यालयात पार पडले. सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ आणि सायंकाळी हा विवाह पार पडला. संदीपचे वडील कशाळचे माजी उपसरपंच अर्जुन जाधव हे देखील मागील तीन वर्षांपासून अंथरुणावर पडून आहे.संदीपचा भाऊ दत्ता आणि मामाची मुलगी भाविका यांच्या लग्न सोहळ्यात घरातील कर्त्या तो प्रमाणे दिवसभर राबत होता. 

विवाह सोहळा झाल्यावर कन्यादान व इतर धार्मिक विधी झाल्यावर नववधू वरांसह वऱ्हाडी मंडळी माघारी निघाली. लग्नात मिळालेले फर्निचर, भांडी, कपाटे संदीपने भावकी व मित्राच्या मदतीने टेम्पोतून घरी पाठविले, आणि तोही दुचाकीवरून निघाला.भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनांनी त्याला जोरात टक्कर दिली त्याच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
त्याच्या पाश्चात्य वडील, आई, भाऊ,बहीण असा परिवार आहे. संदीपच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT