पुणे

अनोखी ‘बिकट वाट वहिवाट’ (व्हिडिओ)

नीला शर्मा

आपणही नाटकाचा एक घटक आहोत, त्यात सामावलेले आहोत, असा विरळा अनुभव देणारा ‘बिकट वाट वहिवाट’चा प्रयोग लक्षवेधी होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात (गुरुकुल) नाट्य प्रशिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या यंदाच्या विद्यार्थ्यांनी बसवलेलं हे नाटक नुकतंच सलग चार दिवस संध्याकाळी सादर करण्यात आलं. संस्थेच्या अंगणमंचावर प्रचंड मोठ्या आकारात उभारलेलं नानाचं घर, ओसरी, शिंप्याचं दुकान, रस्ता, घरामागची घरं वगैरेमुळे खरंच आपण छोट्या खेड्यात आलो असल्याचा आभास निर्माण झाला. लोकसंगीत व लोकनृत्याची जोड घेऊन फुलणारे प्रसंग, चटपटीत संवाद, वैविध्यपूर्ण हालचाली आदींची परिणामकारकता विलक्षण होती. परीक्षेसाठी केलेल्या या प्रकल्पातून उत्तम नटसंच, दिग्दर्शनाबरोबरच इतर तांत्रिक घटकांचाही स्तुत्य प्रयत्न डोळ्यांत भरत होता. 

मोगलाईच्या काळातील एक चिमुकलं खेडं. सरहद्दीजवळच्या या फूलगावात नाना हा अतरंगी गवळी राहत असतो. पाच मुली, दारिद्य्र, गाडीला जुंपायच्या घोड्याच्या पायाला झालेली दुखापत, गावावर रझाकारांकडून हल्ला होण्याची डोक्‍यावर सतत टांगती तलवार अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत जगणाऱ्या नानाचं जीवनाविषयी आगळंवेगळं तत्त्वज्ञान आहे. सोलोम एलिकेम या रशियन लेखकाचं ‘फिडलर ऑन द रूफ’ हे विनोदी संगीतक व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्याकडच्या गावरान संस्कृतीच्या बाजात आणलं. सई परांजपे यांच्या दिग्दर्शनातील हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीला नवा, सुखद स्पर्श देणारं ठरलं. आजही त्याची प्रासंगिकता कमी झालेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT