Pune School Reopen News 
पुणे

पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू, अजित पवारांकडून नवी नियमावली जाहीर

ओमकार वाबळे

1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं. (Pune School Reopen News)

यासाठी नव्याने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. (Schools reopen in pune) तसेच राज्यातील महाविद्यालयं देखील येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. संबंधित नियमावली एका आठवड्यासाठी असणार असून ती पहिली ते आठवीसाठी लागू होणार असल्याचं पवार म्हणाले.

काय असेल नियमावली? (Guidelines for school)

  • शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार

  • शाळेची वेळ फक्त चार तास - विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं

  • मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार

  • पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं

  • ९वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू

  • ८वी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार

  • ५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार

  • रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या

आधी शाळा बंद..आता सुरू !

पुण्यातील शाळा बंदच राहणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली होती. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून फक्त पुण्यातील शाळांसाठी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आठवडाभर शाळा बंदच राहणार आहेत. (Ajit Pawar speaks on schools) पर्यटनस्थळ, उद्याने, जलतरण तलाव यांबद्दल लवकरच नवी नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती पवारांनी दिली होती.

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दिला दर्शवला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली. यामध्ये महत्वाची घोषणा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT