पुण्यातील शाळा बंदच राहणार? महापौरांनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्या तरी पुण्यातील शाळा उघडणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
Murlidhar Mohol Gives Pune School Reopen Updates
Murlidhar Mohol Gives Pune School Reopen UpdatesTeam eSakal

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे (Chief Minister Uddhav Thackeray) शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु (Schools Reopening) करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र स्थानिक प्रशासनानं याबाबत निर्णय घेण्यात यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे. त्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिलेल्या माहितीने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल साशंकता आणखी वाढली आहे. 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली असली, तरी आम्ही शनिवारी कोविड आढावा बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Murlidhar Mohol Gives Pune School Reopen Updates)

Murlidhar Mohol Gives Pune School Reopen Updates
पुणे : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी

राज्य सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांना कोरोना विषाणु संसर्गाच्या (COVID19) परिस्थितीवरून निर्णय घेण्यास सांगितले आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली संख्या 7000 च्या जवळपास आहे. मी या संदर्भात काही बालरोगतज्ञांशी बोललो असून, त्यांनी शाळा उघडण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

Murlidhar Mohol Gives Pune School Reopen Updates
पुणे : पावणे दोन वर्षात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद

ते पुढे म्हणाले, "कोरोनाच्या पहिल्या लाटेत, 1 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं होती, परंतु आता विषाणूची लागण झालेल्या मुलांमध्ये ताप किंवा इतर लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे येत्या शनिवारी यासंदर्भात पुणे महानगरपालिका, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'या बैठकीनंतर, पुढील निर्णय घेण्यापूर्वी पालक संघटना, रुग्णालये इत्यादींशी संपर्क साधला जाईल', असंही मोहोळ म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com