नसरापूर, ता. १४ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच हशा-टाळ्यांचीही मैफल यावेळी रंगली होती. महाविद्यालयातील परीक्षा, विभागवार क्रीडा स्पर्धा, विविध वैयक्तिक स्पर्धा, आविष्कार संशोधन स्पर्धा आदींमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी माजी विद्यार्थी संघातर्फे वाणिज्य विभागामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तन्वी जगताप हिला कै. रवींद्र कोंडे यांच्या स्मरणार्थ रोख बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला रचना फाउंडेशनचे समन्वयक व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे, सकाळचे मुख्य उपसंपादक व विनोदी साहित्यकार सु. ल. खुटवड, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष अप्पा सावंत, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे आदी उपस्थित होते.
या वेळी श्रीपाद कोंडे यांनी विद्यार्थ्यांना कितीही संकटे आली तरी हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करीत राहण्याचा सल्ला दिला. सु. ल. खुटवड यांनी विविध किस्से व चटकदार वाक्यांची पेरणी करीत हशा आणि टाळ्यांची मैफल रंगवली. त्याचबरोबर महाविद्यालयीन काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. शितोळे यांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने अभ्यास करून आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पौर्णिमा कारळे यांनी केले. प्रा. संदीप लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रा. सहदेव रोडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.