Vittal Shelar and Sharad Mohol
Vittal Shelar and Sharad Mohol sakal
पुणे

Pune Crime : शरद मोहोळ खूनप्रकरणी विठ्ठल शेलारसह १७ जणांविरुद्ध ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शरद मोहोळ खून प्रकरणी गुंड विठ्ठल शेलार याच्यासह १७ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेश दिले. या प्रकरणी गुन्हे शाखेने १५ आरोपींना अटक केली असून, अन्य दोघेजण अद्याप फरार आहेत.

कोथरूड येथील सुतारदरा परिसरात आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. पाच जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात टोळीप्रमुख विठ्ठल शेलारसह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०), नामदेव महिपती कानगुडे (वय ३४), विठ्ठल किसन गांडले (वय २०, तिघेजण रा. सुतारदरा, कोथरूड), अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. पर्वती), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड रस्ता, मुळशी), रवींद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदे गाव, ता. मुळशी), संजय रामभाऊ उढाण (वय ४३, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. भूगाव, ता. मुळशी), धनंजय मारुती वाटकर (वय २५, रा. सैदापूर, कराड), नितीन अनंता खैरे (वय ३४, रा. गादिया इस्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४, रा. पिरंगुट, ता. मुळशी), संतोष दामोदर कुरपे (वय ४९, रा. परमहंस नगर, कोथरूड), रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, रा. आंबेगाव, उरवडे, ता. मुळशी), विठ्ठल महादेव शेलार (वय ३६, रा. बोथरवाडी, उरवडे, ता. मुळशी), प्रीतसिंग (रा. उमरठी, मध्यप्रदेश) आणि गणेश मारणे (रा. कर्वेनगर) अशी मोका दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शेलार याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे २१ गुन्हे दाखल आहेत. आरोपी गणेश मारणे आणि प्रीतसिंग अद्याप फरार आहेत.

या टोळीविरुद्ध गुन्हे-१ शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे ‘मोका’चा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करून पोकळे यांनी प्रस्तावास मान्यता दिली.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक विवेक पाडवी, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलिस अंमलदार सुनील राऊत, शरद वाकसे, नितीन कांबळे, नितीन काळे, गणेश ढगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक आयुक्त तांबे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT