Haaziq-Kazi-1.jpg
Haaziq-Kazi-1.jpg 
पुणे

पुण्यातील हाजिकने बनवले समुद्र स्वच्छ करणारे जहाज

सकाळवृत्तसेवा

पुणे  :  समुद्रातील प्रदुषण कमी करणे व समुद्रीय जीवांचे रक्षण करण्याच्या दृष्टिने एका बारा वर्षीय मुलाने एक जहाजाचे डिझायन बनविले आहे. 'हाझिक काझी' असे या मुलाचे नाव आहे आणि "एर्विस' असे नाव त्याने जहाजाला दिले आहे. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हाझिकने सांगितले, "मी काही लघुपट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, समुद्रीय जीवांवर प्रदुषण, कचरा याचा कसा परिणाम होतो. हे थांबविण्यासाठी काहीतरी करायला हवे, याची जाणीव मला झाली. जे मासे आपण जेवणात खातो, ते मासे प्लॅस्टिक खातात आणि या माश्‍यांद्वारे प्रदुषण आपल्या शरीरात पोहोचते. मानवी जीवनावर या प्रदुषणाचा परिणाम घातक असल्याने मला 'एर्विस'ची कल्पना सुचली.' 

'एर्विस'ची कार्यप्रणाली सांगताना हाझिक म्हणाला, "सॉसर नावाची यंत्रणा जहाजाला लावली आहे. याद्वारे समुद्रातील कचरा शोषून तो एका युनिटमध्ये जमा केला जातो. ज्यानंतर पाणी, समुद्रीय जीव व कचरा यांना वेगळे केले जाते. या प्रक्रियेनंतर पाणी व समुद्रीय जीव समुद्रात सोडून दिले जातात. पाणी, समुद्रीय जीव व कचरा यांचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टिने जहाजात सेंसर किंवा यंत्रणा बसविण्यात आली आहे. जी यातील फरक मशीनला कळवते व विभागणी करते. जमा कचऱ्याला पाच भागात विभागले जाते.'

''टेड-एड स्टुडंट्स टॉक' या 'शो'मध्ये त्याची मुलाखत घेण्यात आली होती. 
"समुद्रातील कचरा त्याच्या आकारानुसार जहाजाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळा केला जाऊ शकतो,' असा दावाही हाझिकने केला आहे. हाझिकचे मॉडेल आंतरराष्ट्रीय स्तरावरही सादर केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्वान आणि संस्थांकडूनही त्याचे कौतूक केले जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT