shirsai.jpg 
पुणे

शिर्सुफळची शिरसाई देवी यात्रेला घटस्थापनेने आजपासून सुरवात

संतोष आटोळे

शिर्सुफळ : ''संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या व माकडांना देव माननाऱ्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवी यात्रेला रविवार (ता.28) पासुन घटस्थापनेने सुरवात होत असुन मुख्य यात्रा 8 व 9 मे ला संपन्न होणार आहे.'',अशी माहीती यात्रा उत्सव कमिटीच्यावतीने देण्यात आली.

येथील श्री शिरसाई देवी यात्रोत्सवाबाबत पुजारी संजय गुरव यांनी दिलेल्या माहीती नुसार, रविवार (ता.28) सकाळी घटस्थापनेने यात्रेला सुरवात होणार आहे. येथून दररोज पहाटे पुजा व संध्याकाळी पालखीची मंदिर प्रदिक्षणा तर, पाचव्या दिवशी पासुन वाघ्यामुरळीचा कार्यक्रम व देवीचा छबीना मंदिर प्रदिक्षणेसाठी काढण्यात येईल.  6 मेला नववी माळ घालून घटविर्सजन करण्यात येईल. या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 7 मे ला अक्षयतृतीया आहे. त्यानंतर बुधवार व गुरुवारी मुख्य यात्रा होणार आहे. यामध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहाटे पासुन देवी दर्शन, चोळीपातळ व दंडवत, तसेच संध्याकाळी परिसरातील विविध गावांच्या देवतांचे छबिने येणार आहेत. मध्यरात्री परंपरेप्रमाणे रावणगाव (ता.दौंड) यांचा नेत्रदिपक असा राक्षसदहन कार्यक्रम होणार आहे.
 
9 मे पहाटे पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघून दुपारी मंदिरात विसावेल. या दोन दिवसाच्या कालखंडात गुरुवार दुपारी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर व संध्याकाळी मालती इनामदार यांच्या लोकनाट्य तमाशाच्या मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यात्राकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, याबाबत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे अशी माहीती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामसेवक दत्तात्रय लोणकर यांनी दिली.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT