पिंपळगाव- खडकी (ता आंबेगाव) : बाजीराव महाराज बांगर यांनी आपल्या बंगल्यावर तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. बाजीराव महाराज बांगर (उजवीकडून पहिले) आपल्या कुटुंबांसह.
पिंपळगाव- खडकी (ता आंबेगाव) : बाजीराव महाराज बांगर यांनी आपल्या बंगल्यावर तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. बाजीराव महाराज बांगर (उजवीकडून पहिले) आपल्या कुटुंबांसह. 
पुणे

शिवभक्ताने बंगल्यावर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या राहत्या बंगल्यावर तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.

बांगर आठ वर्षांपासून शिवचरित्र व शंभूराजे यांचे चरित्र सांगण्याचे काम करतात. नाट्य रूपाने हुबेहूब प्रसंग सांगण्याची त्यांची खासियत आहे. विशेष म्हणजे संगीताची साथ देणारे मुस्लिम समाजाचे युवक आहेत. बंगल्याच्या प्रवेश द्वारावर दोन मावळे, इमारतीवर शिवमुद्रा व पहिल्या मजल्यावर शिवचरित्र अभ्यासकासाठी ग्रंथालय सुरू केले आहे. अभ्यासिका शिवप्रेमींसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत खुली ठेवली आहे.

बाजीराव महाराज म्हणाले, "शिवाजी महाराज यांना थेट घरात आणण्याचे व दररोज त्यांची पूजा करण्याचे माझे स्वप्न होते. बंगल्याचे काम सुरू केले. मंचर येथील शिल्पकार गणेश पांचाळ व वसंत परदेशी यांच्याबरोबर चर्चा केली. कोणत्या गावात पुतळा बसविणार असे त्यांनी मला विचारले. मी सांगितले, माझ्या बंगल्यावर महाराजांचा पुतळा बसवायचा आहे. त्या वेळी त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांनी होकार देऊन उभा पुतळा तयार करण्याचे काम सुरू केले. पंधरा दिवसांत पुतळा तयार झाला.'' उभारलेला पुतळा पाहण्यासाठी दररोज शिवभक्तांची गर्दी होत आहे. शिवभक्त गोरक्षक पंडित मोडक, वैभव पोखरकर, अनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याचा नुकताच अनावरण समारंभ झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT