आळंदी (ता. खेड) - सिद्धबेट बंधाऱ्यातून होणारी पाणीगळती आणि बेसुमार वाढलेली जलपर्णी.
आळंदी (ता. खेड) - सिद्धबेट बंधाऱ्यातून होणारी पाणीगळती आणि बेसुमार वाढलेली जलपर्णी. 
पुणे

पाणीसाठा असूनही टंचाई

सकाळवृत्तसेवा

आळंदी येथील बंधाऱ्याच्या नादुरुस्त ढाप्यांमुळे हजारो लिटर पाण्याची गळती
आळंदी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीवरील सिद्धबेट येथील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असा संदेश काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविला. मात्र, बंधाऱ्यात पाणीसाठा चांगला असून, नादुरुस्त ढाप्यांमुळे गळती होत आहे. पाणी वाया जात आहे. बंधाऱ्यात पाणी असूनही दिवसाआड पाणी का, असा सवाल विचारला जात आहे.

आळंदीत आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली. गावठाणात खेड हद्दीत सकाळपासून पाणी वितरित झाले. त्यामुळे उद्या गावठाणात पाणी नसेल. देहूफाटा, काळेवाडी, इंद्रायणीनगर या नदीपलीकडील भागात उद्या पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काही नगरसेवक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे कारण सांगताना सिद्धबेटमधील बंधाऱ्यात पाणीसाठा कमी झाल्याचे सांगत आहेत.

तसे संदेश सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविले जात आहेत. वस्तुतः इंद्रायणी नदीवरील या बंधाऱ्यात सध्या तरी बऱ्यापैकी पाणी आहे. या बंधाऱ्याचे ढापे चांगले नसल्याने हजारो लिटर पाणी गळतीद्वारे वाया जात आहे. गळतीद्वारे वाया जाणारे पाणी नगरपालिका का रोखू शकली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून येणारे लाखो लिटर सांडपाणी याच बंधाऱ्यात अडविले जाते आणि हेच सांडपाणी शुद्धीकरण केल्यानंतर शहरात वापरासाठी वितरित केले जात आहे. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांकडून दिले जाणारे कमी पाणीसाठ्याचे कारण नागरिकांना तकलादू वाटत आहे.

जलपर्णी रोखण्यात अपयश
केळगाव ते सिद्धबेट येथील इंद्रायणीतील बंधाऱ्यात सध्या बेसुमार जलपर्णी वाढली. बंधाऱ्याच्या खाली गरुडस्तंभापर्यंत जलपर्णी केवळ वाढलीच नाही, तर बहुतांश ठिकाणी वाळून गेली आहे. जलपर्णी रोखण्यासाठी लावलेले प्लॅस्टिकचे बॅरेल पालिकेच्या दुर्लक्षामुळे अस्ताव्यस्त झाले आहेत. बॅरेलचा खर्च वाया गेला असून, जलपर्णी रोखण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. याशिवाय, पालिकेने जलपर्णी काढण्यासाठी वार्षिक ठेका दिला. मात्र, कार्तिकी यात्रेनंतर यावर कामच झाले नसल्याने प्रदूषणात भर पडल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT