Panchnama
Panchnama Sakal
पुणे

आधीच उन्हामुळे घाम अन् आपुलकीचे दाम...

सु. ल. खुटवड

‘कडक उन्हापासून रक्षण करायचंय’? ‘कोणीतरी तुमच्या डोक्यावर छत्री धरुन, तुम्हाला व्हीआयपी वागणूक द्यावी, असं वाटतंय,’ ‘अगदी थोड्या अंतरावर तुम्हाला सावलीतून जावंस वाटतंय,’

‘कडक उन्हापासून रक्षण करायचंय’? ‘कोणीतरी तुमच्या डोक्यावर छत्री धरुन, तुम्हाला व्हीआयपी वागणूक द्यावी, असं वाटतंय,’ ‘अगदी थोड्या अंतरावर तुम्हाला सावलीतून जावंस वाटतंय,’ ‘चालत चालत एसीचा, थंडगार पाण्याचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही अल्पदरात या सुविधा पुरवू. शिवाय प्रवासादरम्यान वाळा घातलेलं थंड पाणी, उसाचा रस, कोकम सरबत वा ताक (लिंबू सरबत क्षमस्व) आदी सेवा पुरवतो. मंडईतील एका दुकानावरील या पाट्या पाहून आम्ही थांबलो.‘दारापर्यंत सोडवणारी आपुलकीची माणसं’ ही टॅगलाईन वाचून दुकानदाराचं कौतुक वाटलं.

‘नमस्कार ! आपली काय सेवा करू?’’ साठीतील गृहस्थ सुहास्य वदनाने सामोरे आले. दुकानदार म्हटलं की ग्राहकांवर खेकसणे, हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते, याला छेद देणारे हे उदाहरण होते.

‘आम्ही पुण्यातच आहोत ना.’ असं म्हणून स्वतःला चिमटा काढला.

‘हा कसला व्यवसाय आहे?’ आम्ही शंका व्यक्त केली.

‘आता कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हात पाच-दहा पावलं चालणंही अवघड झालंय. पीएमपी बस घरापर्यंत सोडत नाहीत, त्यातच जवळची भाडी रिक्षावाले नाकारतात. त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव उन्हा-तान्हात घर गाठावं लागतं. यातूनच या व्यवसायाचा जन्म झाला.’ दुकानदारानं माहिती पुरवली.

‘लोकांनी छत्री आणल्यास व्यवसाय बसेल ना.’ आम्ही शंका व्यक्त केली.

‘लोकं जिथं बसतात, तिथंच छत्री विसरतात. त्यामुळं आमचा धंदा बसणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. शिवाय छत्री आणली तरी ती वागवावी लागते, तिची देखभाल- दुरूस्ती करावी लागते शिवाय ती एकट्याला हातात घ्यावी लागते. तुम्ही पिशव्या सांभाळणार की छत्री सांभाळणार?’ दुकानदाराने सवाल केला.

‘तुमच्या डोक्यावर आम्ही छत्री धरून चालतो. त्यामुळं तुमची इज्जत आपोआप वाढते. ‘कोण व्हीआयपी’ चाललंय, असं म्हणून लोकं तुमच्याकडं आदरानं पहातात. शिवाय पुण्यात रस्ता ओलांडणं, हा जीवावर बेतणारा प्रसंग असतो. आम्ही विनामोबदला रस्ताही ओलांडून देतो.’ दुकानदाराने माहिती दिली.

‘एकाचवेळी पाच-सहा जण आल्यावर काय कराल?’ आम्ही विचारले.

‘शेअर ए रिक्षा’ मध्ये जसे करतात, तसेच आम्हीही करतो. एकाच रस्त्यावरील तिघेजण आम्ही निवडतो व एका मोठ्या छत्रीतून त्यांना सोडतो.’

‘तुमचं घर एक किलोमीटरच्या आत असल्यास चालत छत्रीतून पोचवतो. त्यापेक्षा लांब असल्यास रिक्षाची मदत घेतो. त्यावेळी रिक्षाभाडे वेगळे द्यावे लागते.’

‘आम्हाला शनिवारवाड्याजवळ सोडता का?’ असं आम्ही विचारल्यावर दुकानदारानं आम्हाला एक फॉर्म भरायला दिला.

त्यातील ‘आम्ही ‘एसी’चा अनुभव व रस्त्यात कोकम सरबत हवाय’ या सुविधांची निवड केली. त्यानंतर एक तरुणानं आमच्या डोक्यावर छत्री धरली.आपल्या डोक्यावर कोणीतरी छत्री धरतेय, ही शाही कल्पनाच सुखावणारी वाटली. रस्त्यातील अनेक लोकं आमच्यावर जळत असल्याचं जाणवलं. ‘एसी चालू करा’ असं फर्मान सोडल्यानंतर छत्रीच्या आतील एक छोटा पंखा त्याने सुरू केला. त्यावर अधून-मधून पाण्याचा फवारा होऊ लागला. थंडगार झुळूक व पाण्याचे तुषार अंगावर पडत असल्याने आम्ही सुखावलो. कोकम सरबत मागितल्यावर पिशवीतून काढून दिले . दहा मिनिटानंतर त्याने आम्हाला इच्छित स्थळी सोडले.

‘एकशेवीस रुपये भाड्याचे व साठ रुपये हाफ रिटर्नचे असे एकूण १८० रुपये भाडं द्या.’ त्या तरुणानं सांगितले.

‘हाफ रिटर्न भाडं? ही काय रिक्षा आहे काय?’ आम्ही आता चिडलो होतो.

‘साहेब, इकडून जाताना आम्ही मोकळेच जाणार ना. त्याचा भुर्दंड आम्ही का सोसायचा?’ तरुणाने हा प्रश्‍न विचारताच आम्ही निमूटपणे १८० रुपये त्याच्या हातावर टेकवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT