social work and honor to farmer supriya sule politics
social work and honor to farmer supriya sule politics Sakal
पुणे

Supriya Sule : जनतेची सेवा आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देणार; सुप्रिया सुळेंचा माळेगावात संकल्प

कल्याण पाचांगणे

माळेगाव : माय-बाप जनतेच्या सेवा करताना शेतकऱ्यांनाही सन्मान मिळवून देण्याचा संकल्प आज माळेगाव खासदार सुप्रिया सुळे यांनी तुतारीच्या निनादात केला. `माळेगावकरांनो ही तुतारी संघर्षाला प्रोत्साहन व प्रेरणा देणारी आहे.

तुमच्या सहकार्य़ाने बारामती लोकसभा निवडणूकीत यश मिळविणार आहे,` असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. `एक नंबर खासदार...कामगिरी दमदार` अशी घोषणाबाजी करीत माळेगावच्या कार्य़कर्त्यांनीही यावेळी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे, अॅड. राजेंद्र काटे, वनिता बनकर, जिल्हा सरचिटणीस अमित चंद्रकांत तावरे, भरत कदम, प्रताप सातपुते,

गौरव जाधव, अमिर तावरे, बाबाराजे पैठणकर, माया खोमणे, श्रीहरी येळे, वर्षा शिंदे, वसंतराव पैठणकर, निलीमा खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, केंद्रस्तरावर बारामती-दौंड रेल्वे विद्युतीकरण असो,

बारामती फलटण रेल्वे पुर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करणे असो, अथवा पाटस-बारामती-इंदापूर पालखी मार्ग असो, अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून सुळे यांचे आजवरचे संसदीय कार्य़ घरोघरी पोचले आहे, अशी माहिती तालुका कार्य़ाध्यक्ष गौरव जाधव यांनी स्पष्ट केली. तोच धागा पकडत सुळे म्हणाल्या,`` जनतेचे भविष्य घडविण्याचे कार्य़ खासदार म्हणून आजवर मी केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खरेतर माझ्या संसदीय कार्य़ाचा सन्मान केला आहे. त्यामुळे आगामी बारामती लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने लोकांकडे मते मागण्यासाठी मी नम्रतेने गावोगावी जाते आहे. मला लोकांचा चांगला पाटींबाही मिळतो आहे.`` यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष भरत कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जनतेशी संवाद साधण्यासाठी पक्ष कार्य़ालय

सुप्रिया सुळे म्हणाल्या,`` राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे गोविंदबाग हे निवासस्थान माळेगावात आहे. त्यामुळे गोविंदबाग म्हणजेच माळेगावचे पक्ष कार्य़ालय समजणे आवश्यक होते, परंतु माळेगावकरांच्या आग्रास्तव खरेतर गावामध्ये स्वतंत्र पक्षाचे कार्य़ालय सुरू केले. या कार्य़ालयाच्या माध्यमातून माळेगाव बुद्रूक, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, आंदोबावाडी आदी गावातील जनतेशी संवाद साधणे सोयीचे जाणार आहे.``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT