Ajay Kumar Singh
Ajay Kumar Singh sakal
पुणे

Ajay Kumar Singh : दक्षिण मुख्यालय जगात सातव्या क्रमांकाचे ; सिंह

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालय हे जगातील सातव्या क्रमांकाचे सशस्त्र बल आहे, असे मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

रोटरी क्लबच्या कोथरूड शाखेतर्फे आयोजित रोटरी एक्सलन्स ॲवॉर्ड वितरण समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी परराष्ट्र सचिव आणि पुरस्काराचे मानकरी विजय गोखले, पुण्याचे प्रादेशिक पारपत्र अधिकारी व पुरस्काराचे मानकरी डॉ. अर्जुन देवरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष इंद्रनील मुजगुले, सचिव राजेश भाटे आदी व्यासपाठीवर उपस्थित होते. सिंह यांच्या हस्ते गोखले आणि देवरे यांना रोटरी एक्सलन्स ॲवॉर्डने गौरविण्यात आले. मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सिंह म्हणाले, ‘‘विजय गोखले हे भारत-चीन संबंध विषयातील सुपर एक्स्पर्ट आहेत. या दोन देशांमधील संबंध सुधारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यात गोखले यांची निर्णायक भूमिका आहे. पुरस्काराचे दुसरे मानकरी डॉ. देवरे हेसुद्धा परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचीही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. सीमावर्ती भागातील शाळांना लष्कर पाठिंबा देत आहे. या शाळांच्या माध्यमातून लष्करी जवानांना स्थानिक नागरिकाच्या संपर्कात राहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.’’

गोखले यांनी सत्काराला उत्तर देताना भारत-चीन संबंधांतील महत्त्वपूर्ण मुद्यांना उजाळा दिला. डॉ. देवरे यांनी प्रादेशिक पारपत्र कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामांबाबतचे सादरीकरण केले. रोटरीच्या सदस्या नीता यादवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मनीष दीडमिसे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT