पुणे

पाणी योजनेसाठी १३ कोटींचा सल्ला;स्थायी समितीपुढे प्रस्ताव

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा

पुणे - गावकऱ्यांनो, तुमच्यासाठी महापालिका पाणीपुरवठ्याची योजना आखतेय. कसा आणि कोठून पाणीपुरवठा करायचा, याचा सल्ला घेण्यासाठी पालिका तब्बल १३ कोटी रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे दाखल झाला आहे. अर्थात, गावकऱ्यांना पाणी कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी योजनेच्या नावाखाली आत्तापासूनच पाण्यासारखा पैसा मुरविण्यास सुरुवात झाली आहे.  

शहराप्रमाणेच नव्या गावांत समान पाणीपुरवठा योजना राबवून गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पातळीवर सुरू आहेत. त्याचवेळी योजनेचे स्वरूप न सांगताच पाण्याचे कारण देत सल्लागार नेमण्यात येत आहे. या सल्लागाराने किती आणि काय काम करायचे, हेही ठरविण्यात आलेले नाही. काम झाल्याचे कागदोपत्री पाहून पैसे मोजण्याची तयारी महापालिकेने ठेवली आहे. 

पालिकेत समावेश झालेल्या ११ गावांत सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ते अपुरे असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यावर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या हालचाली महापालिका गेली तीन वर्ष करीत आहे; परंतु प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने येथील पाण्याचा प्रश्‍न कायम राहिला. त्यात आता आणखी २३ गावे महापालिकेत येणार आहेत. त्यामुळे जुन्या आणि प्रस्तावित अशा ३४ गावांत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने प्रकल्प आराखड्यासाठी सल्लागाराची गरज असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले. 

नगरसेवकांना संशय
नव्या ११ गावांसाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यासाठी योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी सल्लागाराची मदत घेण्याची महापालिकेची भूमिका आहे. समान पाणीपुरवठा योजनेचा निर्णय होण्याआधीच आता अचानक सल्लागार नेमला जाणार असल्याने नगरसेवकांनी संशय व्यक्त केला आहे. आधीच्या योजनेचे सादरीकरण करावे आणि मग योजनेसाठी सल्लागार नेमण्याचा ‘सल्ला’ नगरसेवक योगेश ससाणे यांनी महापालिकेला दिला आहे.  

सल्लागार काय कामे करणार? 
गावांची पाहणी करणे, लोकसंख्या तपासणे, जलवाहिन्या कुठे आणि कशा टाकायच्या, पाणी साठवण टाक्‍या, योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी

यंत्रणा पालिकेची; पैसा सल्लागाराला
प्रकल्पांना वेग यावा, यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपन्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणजे अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याची मदत घेतात. त्या-त्या भागांची भौगोलिक रचना, लोकसंख्या आणि प्रत्यक्ष पाहणी महापालिकेच्या यंत्रणेचा उपयोग करून सल्लागार करतात. मग त्यांच्यावर एवढ्या प्रमाणात पैसे का मोजायचे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडचणी आल्यास अधिकारी सल्लागाराकडे बोट दाखवून मोकळे होतात, असेही दिसून आले आहे. त्यामुळे सल्लागार नेमण्यास माझा विरोध असल्याचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT