esakal | सलाम महिला पोलिस अधिकाऱ्याला! आरोपी निर्दोष सुटताच 'शौर्य पदक' केले परत
sakal

बोलून बातमी शोधा

SSP_Brinda

ब्रिंदा म्हणाल्या की, कोर्टाने या प्रकरणातील तपास आणि अभियोगाचा असमाधानकारकपणे विचार केला, म्हणून त्या आपले पदक परत करत आहेत.

सलाम महिला पोलिस अधिकाऱ्याला! आरोपी निर्दोष सुटताच 'शौर्य पदक' केले परत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंफाळ : ड्रग्स प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर मणिपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक (एएसपी) थाओनाजम ब्रिंदा यांनी शुक्रवारी (ता.१८) मुख्यमंत्री शौर्य पदक परत केले. या ड्रग्स प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी एडीसी अध्यक्ष आणि इतर 6 जणांवर आरोप होते. 

ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भातच पोलिस अधिकारी ब्रिंदा यांना हे पदक देण्यात आले होते. हे पदक परत करताना ब्रिंदा यांनी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांना लिहिलेल्या पत्रात कोर्टाच्या आदेशाचे कारण दिले आहे. कोर्टाने ड्रग्स प्रकरणातील चौकशीला असमाधानकारक मानून सर्व आरोपींची सुटका केली आहे.

पोलिसांचा अंदाज खरा ठरला; जुन्या बिझनेस पार्टनरनंच केलं होतं 8 वर्षांच्या मुलाला किडनॅप!​

ब्रिंदा यांना १३ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री पोलिस पदक प्रदान करण्यात आले होते.

राज्य सरकार आणि एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत ब्रिंदा यांनी हे पदक परत केले आहे. लॅमफेलच्या एनडीपीएस कोर्टाने भारतीय जनता पक्षाचे माजी स्वायत्त जिल्हा परिषद (एडीसी) अध्यक्ष लुखोशी जो आणि इतर सहा जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. ज्या ड्रग्स प्रकरणी भाजप नेता आणि इतर ६ जणांवर ठपका ठेवण्यात आला होता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. 

दिल्लीत शेतकरी नाही, खलिस्तान आणि पाकिस्तानचे नारे लावणारे लोक; BJP आमदाराचं वक्तव्य​

ब्रिंदा म्हणाल्या की, कोर्टाने या प्रकरणातील तपास आणि अभियोगाचा असमाधानकारकपणे विचार केला, म्हणून त्या आपले पदक परत करत आहेत.

ब्रिंदा यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "मला नैतिकदृष्ट्या असे वाटते की, मी देशातील न्याय प्रणालीच्या इच्छेनुसार माझे कर्तव्य बजावले नाही. म्हणून मी स्वत:ला या सन्मानासाठी पात्र समजत नाही. आणि राज्य गृह खात्याकडे मी हे पदक परत करत आहे, जेणेकरून अधिक पात्र आणि निष्ठावान पोलिस अधिकाऱ्याला हे पदक मिळेल."

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image