
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत.
भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा
पुणे : सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात ५० जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झालेली पाहायला मिळाली. स्वाभाविकपणे मास्क आणि शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) या नियमांचं काय झालं हे लग्नाला उपस्थित मंडळींना दिसून आलं.
- सलाम महिला पोलिस अधिकाऱ्याला! आरोपी निर्दोष सुटताच 'शौर्य पदक' केले परत
विशेष म्हणजे या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि अद्याप लस आली नसताना लोकप्रतिनिधीच कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनाच 'दो गज की दूरी, मास्क पेहनना है जरूरी' चा विसर पडला. विवाह सोहळ्यात ५० जणांची मर्यादा पाळण्याचा नियम लोकप्रतिनिधींनीच मोडणे, हे खेदजनक आहे.
- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील
भाजप आमदार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याला विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देताना वधू-वर आणि राजकीय वऱ्हाडी मंडळींनी मात्र 'सर्वसामान्य माणसांना एक नियम आणि आपल्याला एक' असं समजू नये. कारण कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी हे संकट टळलेले नाही. आणि लोकप्रतिनिधींदेखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सर्व नियम पाळावेत, एवढीच अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Marriage Bjp Mla All Rules Social Distancing Were Laid Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..