स्वतः बनविलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींसमवेत अजय कुकनूर.
स्वतः बनविलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींसमवेत अजय कुकनूर. 
पुणे

Video : स्वतःच्या छंदात जपला वडिलांचा वारसा

नीला शर्मा

ती चिमुकली नाव बघणाऱ्याला कळतच नाही की, ही खडूतून कोरलेली आहे. पाटीवर लिहायच्या पेन्सिलीवरचा तो खांबावर चढणारा माणूस पाहून नवल वाटतं. पंख पसरलेले रंगीत पक्षी दाखवत ते सांगतात, ‘हे तर रद्दी कागदापासून बनवले,’ तेव्हा थक्क व्हायला होतं. अजय कुकनूर यांनी घडवलेल्या चित्तवेधक कलाकृती कशापासून बनवल्या आहेत, हे पाहणाऱ्यांना चटकन लक्षात येत नाही, हे त्यांचं अनोखेपण आहे.

नखाएवढी पांढरी तोफ अजय कुकनूर यांनी केली आहे. ही अजब चीज त्यांनी फळ्यावर लिहायच्या खडूमध्ये कोरली आहे. तशीच एक सुबक नावही आहे. खडूतून कोरलेला हात पाहून लहान मुलांना मौज वाटते. कुकनूर म्हणाले, ‘‘मी लहान असताना आईने पोळ्या करण्यासाठी भिजवलेल्या कणकेचा छोटा गोळा मागून घ्यायचो. त्याला आकार देत पक्षी किंवा प्राणी बनवायचो.

माझ्या वडिलांना त्याचं कौतुक वाटायचं. एकदा त्यांनी मला प्लॅस्टिक क्‍ले आणून दिली. ती सुकत नसायची. त्या गोळ्याला वेगवेगळे आकार देत बसायचो. जे केलं असेल ते नंतर मोडून नवं काही सुचेल ते घडवायचो.

बालपणीची ही आवड मोठेपणी खडू, पाटीवर लिहायची पेन्सिल, रद्दी कागद यांसारख्या माध्यमांतून काही करून पाहण्यात विस्तार पावली. माझे वडील लाकूड कोरून काही ना काही बनवत असायचे. ते पाहून मीही आतापर्यंत अनेक लाकडी चमचे तयार केले आहेत. लाकडी की चेन्सबरोबरच मी छोट्या-छोट्या क्रिकेट बॅट व टेनिस रॅकेटसुद्धा तयार केल्या. धान्य पाडण्यासाठी लागणारं भातुकलीतलं अंगठ्याएवढं सूपही बनवलं आहे.’’

कुकनूर यांनी असंही सांगितलं की, एकदा सहज रद्दी कागद गुंडाळताना त्यात बदकांचा आकार जाणवला. थोडी आणखी मेहनत घेऊन बदक तयार केलं. ते रंगवल्यावर छान दिसू लागलं. मग फ्लेमिंगो, पेंटेड स्टॉर्क वगैरे पक्षी बनवले. पंख पसरलेल्या अवस्थेत ते असल्याने उडत असल्याचा भास होतो. कागदाचे लहान-मोठे बाउल बनवले आहेत. त्यांत फुलं ठेवल्यावर त्यांचं रूप आणखी वेगळं दिसतं. दिवाळीत अंगणात, बाल्कनीत आकाशकंदील लावतात तसे आपण घरात लावायला करूया, असं मनात आलं. वेगवेगळ्या आकारांमधले हे लॅम्प शेड आम्ही घरात लावत असतो. लॅम्प शेड आणि पक्षी अलीकडेच करू लागलो, पण चित्रं बालपणापासून काढत आलो आहे. रेखाचित्रं काढायला विशेष आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT